Home आपला जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची सिंदखेडराजा उपविभागामध्ये 7 मार्च पासून सुरुवात!….. प्रा....

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची सिंदखेडराजा उपविभागामध्ये 7 मार्च पासून सुरुवात!….. प्रा. संजय खडसे.

77

बुलडाणा चौफेर वृत्तसेवा : स्मिता उबाळे

उपविभागातील नागरिकांनी या शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा.

शासन सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने माननीय महसूल मंत्री मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान ” हे राबविण्यात येत आहे. महसूल विषयक प्रकरणांचा जलद निपटारा, नागरिकांच्या अडचणींचे तत्पर निराकरण आणि प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

 

चला, सर्वांनी मिळून लोकाभिमुख आणि जबाबदार प्रशासनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया! या टॅग लाईन वरती

महसूल विभागाच्या वतीने सिंदखेडराजा उपविभागामध्ये “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची सुरुवात 7 मार्च पासून होत आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

सर्वसामान्य जनता व शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, महाराष्ट्र जमिन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे/ प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, नागरिकांना Single Day Service Delivery द्वारा सेवा पुरविणे या उद्देशाने महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद / नगर पंचायत पातळीवर “छत्रपती शिवाजी समाधान शिबीर अभियान -” राबविण्यात येत आहे .

पुढील तीन महिन्यांमध्ये सहा अभियान दिवस राबविले जाणार असून त्यामध्ये महसूल विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जनहिताच्या महत्त्वाच्या १५ सेवा एकाच वेळी देण्यात येणार आहे.यामध्ये 1) महसूल विभागाच्या प्रलंबित फेरफार.

2) सातबारा उताऱ्यामधील चुकांची दुरुस्ती.

3) डिजिटल स्वाक्षरी चे सातबारा उतारे.

4) 8 अ उताऱ्याचे वापर.

5) उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र.

6) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.

7) आकर्षक तरतुदी बाबत मार्गदर्शन व सुधारणा व सुधारणा.

8) नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती.

9) सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे.

10) विद्यार्थ्यासाठी दाखले वाटप करणे.

11) तुकडेबंदी कायद्यांच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणाचा निपटारा.

12) पानंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश.

13) घरांसाठी पट्टे वाटप व ई मोजणी अर्ज.

14) ऍग्री स्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी.

15) भूसंपादन आणि अकृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्पर अद्यावत करणे या महत्त्वाच्या 15 सेवा एकाच दिवशी व एकाच ठिकाणी तात्काळ दिल्या जाणार आहे.

 

शिबिराचे मंडळ निहाय वेळापत्रक.

7 मार्च 2026 रोजी : सोनाशी / साखरखेर्डा व तुळजापूर.

14 मार्च रोजी :: किनगाव राजा व मेहूना राजा

10 एप्रिल रोजी :: दुसरबीड व देऊळगाव मही.

17 एप्रिल रोजी :: मलकापूर पांग्रा व अंढेरा.

8 मे रोजी :: सिंदखेड राजा व देऊळगाव राजा.

15 मे रोजी :: शेंदुर्जन.

इत्यादी योजनेचा लाभ हा या शिबिरामध्ये देण्यात येणार आहे तरी सिंदखेडराजा उपविभागामधील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.