Home आपला जिल्हा मेरा बुद्रुक चे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुनिल अंभोरे हे राज्यस्तरीय...

मेरा बुद्रुक चे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुनिल अंभोरे हे राज्यस्तरीय “डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण” पुरस्काराने होणार सन्मानित.

166

बुलडाणा चौफेर वृत्तसेवा : गंगाराम उबाळे (मुख्यसंपादक)

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक गावचे सुपुत्र पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनिल अंभोरे यांना तथागत बहुउद्देशीय संस्था मेहकर द्वारा आयोजित जीवनदीप अनाथ आश्रम व वृद्धाश्रम, राजमाता मा जिजाऊ स्वयं सहायता महिला बचत गट, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरव राष्ट्रीय व राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2026 यामध्ये मेहकर येथे दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सुनिल अंभोरे हे पत्रकारिताक्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक कार्यामध्येही त्यांचे मोलाचे योगदान आहे. विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना या अगोदर “मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट” यांनी त्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला आहे. “विश्वशांती बुद्ध विहार बहुउद्देशीय स्मारक समिती बुद्ध टेकडी यांच्यातर्फे’ “विश्वशांती समाज गौरव” पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. दैनिक भारत संग्राम वाशिम येथे यांच्यावतीने त्यांना “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती नाशिक यांच्या वतीने त्यांना “राष्ट्रीय माणुसकी सेवा गौरव” पुरस्कार “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डी आय सी तर्फे त्यांना उद्योजक प्रशिक्षण शिबिरामध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अखिल भारतीय भिख्खू संघ यांच्यावतीने त्यांना “बौद्ध दिक्षा” प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कालकथित मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतिपितर्थ व समाज भूषण अर्जुनराव गवई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये “राष्ट्रसंत गाडगेबाबा समाज रत्न राज्यस्तरीय” पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे आणि आता त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण हा पुरस्कार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी मेहकर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे.2026 या चालू वर्षाचा पहिलाच राज्यस्तरीय “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण “हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.