Home Breaking News इंन्टाग्राम वर अश्लिल पोस्ट करुन मुलीची बदनामी करणा-या आरोपीस पोफाळी पोलीसांनी केली...

इंन्टाग्राम वर अश्लिल पोस्ट करुन मुलीची बदनामी करणा-या आरोपीस पोफाळी पोलीसांनी केली धाराशीव (उस्मानाबाद) येथुन अटक, मोबाईल जप्त.

293

✒️ बबलू भालेराव✒️ (जिल्हा प्रतिनिधीत् यवतमाळ ) मो.9637107518

उमरखेड (दिनांक १ सप्टेंबर) कुमार चिंता पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी पोस्टे हददीत घडलेल्या महीला विषयकचे संवेदनशिल गुन्हे डिटेक्ट करुन सक्त कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्या  अनुषंगाने दिनांक ०५/०१/२०२४ रोजी उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन येथे हददीतील एका मुलीने फिर्याद दिली होती की, फिर्यादी मुलीचे इंन्टाग्राम व फेसबुक अकाउंट कोणीतरी तिच्या स्वताच्या नावाने वापरुन तिची नाहक बदनामी करित आहे व तिच्या इंन्टाग्राम आयडी वर अश्लिल शब्दरचना टाकुन सोशल मिडीया वर व्हायरल करित आहे, त्यावरुन पोलीस स्टेशन पोफाळी येथे अप.क. ००३/२०२४ कलम ३५४(अ) भादंवि सहकलम ६६ (ई), ६७ माहीती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाच्या तपासात आरोपी हा शिताफीने मोबाईल सिम चा वापर न करता केवळ इंटरनेट चा वापर करित असल्याचे पोलीसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी पोलीसांना वेळोवेळी हुलकावणी देत होता. अखेर पोलीसांनी यवतमाळ सायबर सेल ची तांत्रीक मदत मिळवुन आरोपीचा कौशल्यपुर्वक मागोवा घेवुन आरोपीविषयी सर्व डिटेल्स प्राप्त केले व आरोपी नामे अनिकेत अंकुश गायकवाड, वय २५ वर्षे यांस खानापुर, ता. तुळजापुर, जि. धाराशीव (उस्मानाबाद) येथुन ताब्यात घेतले.

आरोपीस सदर घटनेबाबत विचारपुस केली असता आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केले असुन पिडीत मुलीसोबत इंन्टाग्राम वर ओळख होवुन आरोपीने पिडीत मुलीचे डिटेल्स प्राप्त केल्याचे व त्यानंतर इंन्टाग्राम आयडी वर अश्लिल पोस्ट व्हायरल करुन मुलीची बदनामी करित असल्याचे आरोपीने सांगीतले.

याबाबत तपासात आरोपी वापरत असलेला मोबाईल एक पांढ-या रंगाचा ओप्पो कंपनीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल किंमत १५०००/- रु. आरोपीकडुन पोलीसांनी जप्त केला.

सोशल मिडीयावर अनोळखी व्यक्तीची फेन्ड रिक्वेस्ट स्वीकारु नये तसेच सोशल मिडीया वापरताना नागरीकांनी पुरेपुर दक्षता घ्यावी आणि आपले कोणतेही डिटेल्स अनोळखी व्यक्तीबरोबर शेअर करु नये असे आवाहन पोफाळी पोलीसांकडुन नागरीकांना करण्यात येते.

सदरची कारवाई मा. श्री. कुमार चिंता साहेब, पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री. पियुष जगताप साो, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री. हनुमंत गायकवाड साो, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. उमरखेड, ठाणेदार पंकज दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष झिमटे, सहा. पोलीस उपनिरीक्षक शाम लांडगे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश पाझारे, पोलीस कॉन्स्टेबल हिम्मत बंडगर यांनी पार पाडली.