कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट
राहुरी (अहमदनगर) : तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन सुरू आहे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इंजिनिअरीग कॉलेज येथील खेळाच्या मैदाना वरील मुलांना खेळण्यासाठी केलेले क्रिकेट पीच मुरूम माफियांकडून उत्खनन झाले आहे तसेच मैदाना शेजारी असलेल्या मोकळ्या क्षेत्रातील मरूम मोठ्या प्रमाणात उत्खनन केला असून शाळेतील मुलांना जाण्यासाठी व येण्यासाठी याच मैदानावरून जात होते परंतु येथे मोठे मोठे खड्डे झाल्यामुळे पावसाळ्यातत पावसाचे पाणी या खड्ड्यात साचून काही अनुचित प्रकार घडल्यास यास जबाबदार कोण ? शाळेतील मुलांना जाण्याकरीता रस्ता ही या मुरूम माफीयांनी ठेवला नाही परिसरात हजारो ब्रास मुरूम उत्खनन झालेला असून प्रशासन कोणतेही कारवाई का ? करत नाही सुर्यानगर चिंचविहीरे रामनगर येथील नागरिक त्रस्त झाले आहे .
तसेच राहुरी तालुक्यातील
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे. महसूल खात्याची परवानगी, सरकारची रॉयल्टी भरली नसतांना हजारो ब्रास मुरूम उत्खनन व वाहतूक केली जात आहे.इंजिनिअरींग कॉलेज येथे सध्या कारखाना मालकीच्या क्षेत्रात गौण खनिज उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे. तेथे उत्खनन व वाहतुकीस सरकारची परवानगी घेतलेली नाही. महसूल खात्याकडे रॉयल्टी भरलेली नाही. हजारो ब्रास मुरूम उचलण्यात आला आहे.
लाखो रुपयांचा महसूल बुडवून गौण खनिजाची चोरी सुरू आहे. या भागातील मंडलाधिकारी व महसूल प्रशासनाचे काहीसे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आसल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे. परंतु, महसुल व पोलिस प्रशासनाच्या डोळ्यासमोर गौण खनिजाची लुट सुरु आहे. त्याकडे पोलिस खात्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे माफियाराज वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप ग्रामस्थ व खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी करीत आहे.
मुरूम उत्खनन झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करून, महसूल खात्यातर्फे संबंधित गौणखनिज माफियावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी. अशी मागनी ग्रामस्थ व खासदार निलेश लंके प्रतिष्ठाणचे पदाधिकारी खासदार लंके साहेब तसेच जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे करणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींना दिली आहे.
कारखाना मालकिच्या क्षेत्रात गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती समजली आहे. संबंधितांनी रॉयल्टी भरलेली नाही. मुरूम उत्खनन व वाहतुकीचे परवानगी घेतलेली नाही. राहुरी फॅक्टरी इंजिनिरिंग कॉलेज तसेच वनचेतना शेजारी आसल्याल्या क्षेत्रात संबंधित ठिकाणाचा पंचनामा करून, दंडात्मक कारवाई करणार का? या मुरूम माफियांवर कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा आशीर्वाद आहे का? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे






