Home Breaking News विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला

विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला

342

(उमरखेड हदगाव पैनगंगा पैनगंगा नदीच्या पुलावरून तीन ते चार फूट पाणी)

✒️ बबलू भालेराव✒️ (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9637107518

उमरखेड (दिनांक 3 सप्टेंबर) मागील दोन-तीन दिवसापासून मुसळधार पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळे उमरखेड हदगाव शहराला जोडणारा पैनगंगा नदीच्या पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत असल्यामुळे विदर्भ – मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे.
रहदारीचे सर्व मार्ग बंद झाले आहे त्यामुळे उमरखेड हदगाव रोडवर शेकडो वाहने थांबली आहे.

सध्या पाणी पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे पण मार्ग मोकळे होण्याची शक्यता फार कमी आहे.
पूर परिस्थिती पाहण्याकरिता हजारो नागरिक पैनगंगा नदीच्या काठावर उभे आहेत.