इस्लाम धर्म आणि मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल केले होते वादग्रस्त विधान
✒️ बबलू भालेराव ✒️ (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9637107518
उमरखेड (दिनांक १ सप्टेंबर) रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज यांनी १५ ऑगस्ट रोजी सिन्नर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले होते.
या वक्तव्यामुळे भारताचे नव्हे तर जगा भरातील मुस्लिम समाजाचे भावना दुखाविल्या गेल्याने राज्यभर आंदोलन व निषेध करत रामगीरी महाराजाला अटक करण्याची मागणी केली होती.
या वादग्रस्त वक्तव्यामुळे उमरखेड शहरातील मुस्लिम समाजाने सुध्दा दिनांक १७ ऑगस्ट रोजी उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे पोलीस स्टेशन झालेल्या शांतता कमिटी बैठकीत मुस्लिम समाजाने बहिष्कार घातला होता. तसेच असहकार आंदोलनचा पवित्रा घेतल्याने यवतमाळजिल्हाचे पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी दखल घेऊन अतिरिक्त पोलीस अधिक्षक जगताप साहेबांना उमरखेड येथे पाठविले मुस्लिमअतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि मुस्लिम समाज बांधवामध्ये चर्चा झाली चर्चेअंती समज गैरसमज दूर करून गुन्हा दाखल करून एफआयआर दिला.
यानुसार काल दिनांक ३० ऑगस्ट रोजी राम गिरी महाराजांवर गुन्हा दाखल केला. अश्लील भाषेत अवमान केल्याप्रकरणी, दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९६ (१), १९७, २९९, ३०२, ३५३(१) ब, ३५३(२) आदि कलमान्वेय उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकट:- मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त व अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करायला पोलीस प्रशासन टाळाटाळ करत होते परंतु उशीरा का असेना गुन्हा दाखल करावाच लागला.
पोलीस प्रशासनाने त्या महाराजांना अटक करावी. याबाबतीत आमच्या भावना तीव्र आहेत.उमरखेड शहर मुस्लिम समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली.






