Home आपला जिल्हा मेरा बुद्रुक गावामध्ये पेटली “एक गाव एक होळी” परंपरा कायम. जिल्ह्यात...

मेरा बुद्रुक गावामध्ये पेटली “एक गाव एक होळी” परंपरा कायम. जिल्ह्यात सर्व ठिकाणी होळी व रंगपंचमीचा सण साजरा.

248

बुलडाणा चौफेर : सुनिल अंभोरे प्रतिनिधी‌

बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वच गावांमध्ये होळी आणि रंगपंचमीचा सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.होळी हा रंगाचा प्रेमाचा आणि वसंत ऋतुच्या आगमनाचा लोकप्रिय हिंदू सण आहे. जो फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणात वाईट यावर चांगले च्या विजयाचे प्रतीक म्हणून होळी पेटविले जाते. ज्याला होलीका दहन म्हणतात. दुसरा दिवस धुळवड रंगपंचमी म्हणून रंग खेळून आनंद उत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथांमध्ये होलीकादन हा सण प्रल्हाद आणि होलिकाच्या पौराणिक कथेवर आधारित आहे . हिरण्यकशीपुचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूचा प्रारंभ भक्त होता. प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशीपूची बहीण होली का जी अगणित न जळण्याचे वरदान होते. ती प्रल्हादला घेऊन अग्नीत बसली मात्र प्रह्लाद वाचला आणि होलिका जळून खाक झाली. हे चांगल्या वाईट यावर विजय आहे. होळीच्या दिवशी सर्व लोक आपले जुने राग, द्वेष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल विविध प्रकारचे रंग लावून होळीच्या शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला जातो. ग्रामीण भागामध्ये अजूनही काही मुले पळसाच्या पानाचा किंवा इतर फुलांचा नैसर्गिक रंग बनून एकमेकाला रंगांमध्ये रंगवितात. लहान मुले आणि सर्व वर्गामध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते.

फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण असतो. होळी हा रंगांचा सण आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये येत असलेल्या मेरा बुद्रुक गावामध्ये पुरातन काळापासून चालत आलेली होळी चौकात “एक गाव एक होळी” ही परंपरा अनेक वर्षापासून पाळत आहे. प्रत्येक घरातून गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, व इतर सामान जमा करून होळी तयार केल्या जाते. गावाच्या मध्यभागी मुख्य चौकामध्ये होळी पेटवत असल्यामुळे त्या भागाला सुद्धा होळी किंवा होळी चौक म्हणून संबोधले जाते. या आनंदी उत्साह मध्ये आबाल वृद्धासह महिला व पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. प्रत्येक घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. आपल्या घरी बनवलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य, गाठी व तांब्यामध्ये पाणी आणून होळीभोवती पाणी टाकून पूजा करतात. व होळीतील राख अंगारा म्हणून कपाळाला लावण्यासाठी घरी घेऊन जातात. ग्रामीण भागातील लोकांनी अजूनही जुन्या परंपरा या कायम ठेवत नवीन पिढीला हा वारसा जतन करण्याचा संदेश देत आहे.आजही बहुतेक ग्रामीण भागामध्ये ही परंपरा कायम असून नवीन पिढीमध्ये ही परंपरा कायम राहते? की काळाच्या ओघात वाहून जाते? हा येणारा काळच ठरवेल.