Home आपला जिल्हा मेरा बु.येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान”संपन्न शेकडो महिलांनी घेतला लाभ.

मेरा बु.येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान”संपन्न शेकडो महिलांनी घेतला लाभ.

248

बुलडाणा चौफेर : सुनिल अंभोरे प्रतिनिधी

चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे राबवल्या जाणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान १८ सप्टेंबर 2025 रोजी आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्रात राबविण्यात आले. राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार ,सेवा आणि पोषण यावर विशेष भर देण्यात येत आहे. या याच अनुषंगाने मेरा बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्रात हे अभियान राबविण्यात आले होते. या अभिनयातील उपक्रम सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्यसेवा त्यामध्ये रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत, रोग तपासणी, स्तन व गर्भाशय, मुख व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लिबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकलेस आजार व रक्तश्रेय तपासणी, विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. निरोगी जीवनशैली आणि पोषण यामध्ये स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन देणे . गरोदर आणि स्तंनदा मातांसाठी तसेच, लहान बाळांसाठी योग्य आहार, मासिक पाळी स्वच्छता व पोषण टेक होम राशन टी एच आर चे व्यवस्थित वितरण करणे .आरोग्य सेवा घेणे सोपे करण्यासाठी यामध्ये माता व बाल सुरक्षा एम सी पी कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी करणे, आयुष्यमान वय वंदना कार्ड ,सिकलसेल कार्ड बणविणे.पोषण ट्रॅकर मध्ये लाभार्थी नोंदणी करणे. नागरिकांचा सक्रिय सहभाग यामध्ये रक्तदान शिबिर, निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी ,अवयव दान नोंदणी, करणे हे या स्वस्थ नारी सशक्त परिवारा अभियानांतर्गत कार्यक्रम राबविण्यात आले. “स्वस्थ नारी सशक्त परिवार”अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन मेरा बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच सौ. अनिताताई वायाळ यांनी केले. तसेच उपसरपंच दिनकरराव डोंगरदिवे, ग्रामपंचायत सदस्य गजानन वायाळ,सागर पडघान उपस्थित होते. या आरोग्य अभियानामध्ये औषध निर्माण अधिकारी आरती पवार यांनी आकर्षक रांगोळी द्वारे “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या अभियानातील उपक्रमाचा प्रचार व प्रसार केला. ही रांगोळी अभियानाचे आकर्षण ठरली होती. हे अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ. पूजा गाताडे,औषध निर्माण अधिकारी आरती पवार ,आरोग्य सेवक जीवन वायाळ, अशोक ठोके, आरोग्य सेविका अर्चना कराडे, माधुरी पवार, आर. एस. चव्हाण, आशा वर्कर रूपाली बलकार ,शाहिस्ता मुजम्मिल पटेल ,परवीन शेख मुस्ताक, प्रियंका सतीश पडघान, चंदा डिगांबर दुतोंडे, ग्राम विस्तार अधिकारी पि.टी. साळवे, ग्रामपंचायत लिपिक रवी जाधव, पत्रकार सुनिल अंभोरे हे उपस्थित होते. “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या अभिनयामध्ये मेरा बुद्रुक सह परिसरातील शेकडो महिलांनी लाभ घेतला