राहुरी फॅक्टरी परिसरात नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघात
ममदापूर येथील पती पत्नी जागीच ठार
राहुरी फॅक्टरी परिसरात नगर मनमाड महामार्गावर सेल पेट्रोल पंपासमोर अल्टो कार व माल वाहतूक ट्रक चा सामोरा समोर भीषण अपघात झाल्याने ममदापूर येथील पती पत्नी जागीच ठार झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,शिर्डी कडून नगर कडे जात असलेल्या अल्टो कार MH.14 AV.3372 ला नगर कडून शिर्डी कडे जात असणाऱ्या माल वाहतूक ट्रक KA.01.AN.5697 ने समोरून जोराची धडक दिली असता अल्टो कार मधील दीपक गोविंद म्हसे व माया दीपक म्हसे दोघेही राहणार ममदापूर,बाभळेश्वर हे दोघेही पती पत्नी जागीच ठार झाले आहेत.
दरम्यान घटनास्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदतकार्य केले. तर रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.






