देगलुर – बिलोलीच्या प्रमुख पदाधिकार्यांशी चर्चा
दाऊ गाडगेवाड नांदेड प्रतिनिधी /-
राज्यात विधानसभा निवडणुकिचे वारे वाहताना दिसत आहेत. देगलुर -बिलोली विधानसभा मतदार संघ विकासापासुन कोसो दुर आहे. दलित, मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो. मतदार संघ अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तरी दलित मागासवर्गीय समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासुन बराच दुर आहे किंबहुणा तो दुर ठेवण्यात आला आहे.
त्यामुळे येत्या निवडणुकीत समाजाच्या समस्यांवर आणि विकासाच्या धोरणावर सामाजिक चळवळ या नात्याने संघटनेला ठोस भुमिका घेणे गरजेचे आहे अशी भावना मतदार संघातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली त्यामुळे जिल्हाध्यक्ष किरण फुगारे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष किरण फुगारे व देगलुर तालुकाध्यक्ष विजय शेरे बिलोली तालुकाध्यक्ष आमोल जाधव यांच्यासह संदिप वाघमारे, पंचशिल शेरे,आशोक वाघमारे, धम्मपाल प्रचंड,किरण सोनसळे,संजय वाघमारे,नागार्जुन चावरे,आदी सोबत संघटनेचे कार्यकर्ते ऊपस्थीत होते व यावेळी मनोज सोनकांबळे यांची नायेगाव तालुका कार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली .






