हिमायतनगर/प्रभु कदम
हिमायतनगर येथील पोलिस ठाण्याचे पो.निरिक्षक अमोल भगत यांची गणेशोत्सव निमित्त वाघी येथे भेट. वाघी येथील पोलिस पाटील संतोष दिगांबर खांडरे यांच्या हस्ते त्यांच्या घरी पो. निरिक्षक अमोल भगत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित गावातील सरपंच नामदेव रामराव खांडरे, उपसरपंच संजय दादाराव माने, दिगांबर देवसरकर , श्रीराम माने, संभाजी माने, तसेच ज्येष्ठ नागरिक माधराव कदम (गुरुजी) सोपान प्रकाश बोने जवळगाव पोलीस पाटील हे उपस्थित होते.
त्यांनंतर पो.निरिक्षक अमोल भगत यांनी गणेश मंडळाला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले त्यांनंतर पो.निरिक्षक अमोल भगत यांनी गणेशोत्सव निमित्त सर्व गणेश मंडळांना बोलावून त्यांची बैठक घेतली.
त्याबाबत सविस्तर वुत्त असे पो. निरिक्षक अमोल भगत यांनी सांगितले की आपण सर्वांनी एकोप्याने एकत्रित राहुन गणेशोत्सव चांगल्याप्रकारे पार पाडावा व कायदाच्या नियमाचे पालन करुन सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे ते म्हणाले 
आजची नवतरुण पिढी ही व्यसनाला बळी न पडता अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे बोलताना म्हणाले व त्यांनंतर गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूकसाठी डि. जे. लावल्यामुळे डि.जेच्या ध्वनी प्रदुषणमुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी सर्व गणेश मंडळांनी घेतली पाहिजे असे ते म्हणाले.
एक गाव एक गणपती असायला पाहिजे व त्यामुळे कोणत्याही वादविवाद निर्माण होणार नाही पुढे बोलताना ते डि. जे. ऐवजी ढोल ताशा गजरात गणरायाचे विसर्जन करावे असे बोलताना म्हणाले.
सर्वांनी जे गणपतीच्या वर्गणीतून डि. जे.ला पसंती न देता गावातील रस्त्याच्या अवतीभोवती सि. सि. टि .वी . कॅमर्या लावावे असे त्यांनी सांगितले यावेळी बैठकलीला गावातील नागरिकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभला.
यावेळी उपस्थित नागरिक रमेश देवसरकर, पुंजाराम गोप्पनपले,दिगांबर खांडरे, उबाठाचे कामारी सर्कल गण प्रमुख श्रीराम माने, बळीराम कदम, अविनाश हामंद, गंगाधर हामंद, सरपंच नामदेव खांडरे,व तसेच सर्व गणेश मंडळ उपस्थित होते.






