Home Breaking News उमरखेड उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन माजी सैनिक वीर पत्नीच्या हस्ते करा

उमरखेड उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन माजी सैनिक वीर पत्नीच्या हस्ते करा

172

✒️बबलू भालेराव ✒️ (उमरखेड ता. प्रतिनिधी )
मो 9637107518

आजाद समाज पार्टीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

उमरखेड प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत गेल्या अनेक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून उद्घाटनासाठी मंत्री खासदार आणि आमदार यांना वेळ मिळत नसल्यामुळे सदर उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन देशासाठी सीमेवर बलिदान देणाऱ्या वीर पत्नीच्या व माजी सैनिकाच्या हस्ते करण्यात यावं अशी मागणी दिनांक 29 ऑगस्ट रोजी आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली,

आजाद समाज पार्टीच्या वतीने 31 जुलै रोजी उमरखेड येथील रुग्णालयाची इमारत जुनी जीर्ण झाल्यामुळे भविष्यात इमारत कोसळून जीवितहानी व वित्तहानी होऊ नये यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात याव या मागणीसाठी 15 ऑगस्ट रोजी रुग्णालयासमोर डफली बजाव आंदोलन छेडण्याचा इशारा उमरखेड वैद्यकीय अधीक्षक यांना

निवेदनाद्वारे देण्यात आला होता, 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनी होणारे डफली बजाव आंदोलन करण्यात येऊ नये अशी विनंती लेखी पत्राद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केली होती 31 ऑगस्ट पूर्वी यवतमाळ जिल्ह्याचे मंत्री संजय राठोड, हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, उमरखेड महागाव चे आमदार नामदेव ससाने यांची उद्घाटनासाठी तारीख घेऊन वेळ मागून 31 ऑगस्ट पूर्वी उद्घाटन करण्याचे आश्वासन जिल्हा

शल्य चिकित्सक यांनी दिले होते परंतु राजकीय श्रेय वादाच्या लढाईत लोकप्रतिनिधींना वेळ मिळत नसल्यामुळे सदर नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून विविध राजकीय पक्ष संघटनाची खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व लोकप्रतिनिधींना उद्घाटनासाठी वेळ

मिळत नसेल तर उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन वीर पत्नी व माजी सैनिकाच्या हस्ते करण्यात याव अन्यथा ग्रामीण रुग्णालय समोर डफली बजाव आंदोलन करून आरोग्य विभागाच्या निषेध करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव, प्रफुल दिवेकर, सचिन वाहुळे, युवा तालुकाध्यक्ष विष्णुकांत वाडेकर, विनोद बर्डे सर, गौतम कांबळे, सुशांत धोंगडे, आशीद भवरे