Home Breaking News पळशी येथील कामाची गुण नियंत्रक विभागामार्फत चौकशी करा

पळशी येथील कामाची गुण नियंत्रक विभागामार्फत चौकशी करा

86

संयुक्त पत्रकार संघ, उमरखेड
✒️ बबलू भालेराव ✒️
(उमरखेड तालुका प्रतिनिधी )
मो 9637107518

उमरखेड दिनांक २८ ऑगस्ट २०२४

उमरखेड तालुक्यातील पळशी येथील ग्रामसेवकांनी केलेल्या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला असून या कामाची गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यवतमाळ,उपविभागीय अधिकारी उमरखेड. गटविकास अधिकारी पं. स. उमरखेड यांना संयुक्त पत्रकार संघ उमरखेड यांचे वतीने आज दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी निवेदन देण्यात आले.

उमरखेड पंचायत समिती अंतर्गत मौजा – पळशी येथे ग्रामसेवक म्हणुन आढागळे हे जेव्हा रुजू झाले तेव्हापासुन त्यांनी तिथे केलेल्या प्रत्येक कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. प्रत्येक कामाचे टेंडर पारदर्शकपणे न लावता टेंडर मॅनेज करुन स्वतःच्या मर्जीतील ठेकेदाराच्या नावाने टेंडर देण्यात येऊन सर्व कामे निकृष्ट दर्जाची केलेली आहेत.

संबंधीत ग्रामसेवक हे गावकरी व इतर कुणीही त्यांना नियमानुसार माहिती मागितल्यास त्यांनी भ्रष्टाचार केला असल्याने माहिती पुरवित नाहीत. तेव्हा विनंती की, त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची आपल्या स्तरावर चौकशी करण्यात यावी.

तसेच गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी आणि त्यापुर्वी तात्काळ त्यांची बदली करण्यात यावी व त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीर्व आंदोलन छेडण्यात येईल असा संयुक्त पत्रकार संघ इशारा निवेदनातून देण्यात आला यावेळी संस्था पत्रकार संघातील समस्त पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.