Home आपला जिल्हा किनगावराजा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान यशस्वीरित्या पडले पार..

किनगावराजा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान यशस्वीरित्या पडले पार..

146

-उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार अजित दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांचे झाले समाधान.

अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

बुलडाणा चौफेर : गंगाराम उबाळे 

महाराष्ट्र शासनाचे महत्वकांक्षी असलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान ‘ राबविण्यासाठी सिंदखेडराजा प्रशासन सज्ज होते उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अजित दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व अभियान यशस्वीपणे पार पाडत आहेत, आज याच शिबिराच्या निमित्ताने किनगावराजा मंडळकरिता अभियान राबविण्यात आले आहे.

आजच्या या समाधान शिबिरासाठी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आजच्या या शिबिरामध्ये तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय , महिला व बालविकास विभाग,आरोग्य विभाग,पशु संवर्धन विभाग,सहकारी संस्था, कृषी विभाग,पशु संवर्धन विभाग,दुय्यम निबंधक कार्यालय

,वन विभाग,महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळ,पंचायत समिती इत्यादि शासनाच्या विविध विभागाच्या देण्यात येणाऱ्या सेवा उपलब्ध करण्यात आल्या.

 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाची (टप्पा क्र. १) प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

 

१. लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन

२.डिजिटल सेवांचा प्रसार आणि वापर

​महाभूमी पोर्टल: ई-फेरफार, ई-मोजणी, ई-चावडी आणि ई-रेकॉर्ड्स यांसारख्या डिजिटल सेवांचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जाईल.

3.डिजिटल ७/१२: क्यूआर कोडयुक्त डिजिटल ७/१२ उताऱ्याला पूर्ण कायदेशीर वैधता प्राप्त झाली असून, आता तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही, याबाबत जनजागृती केली जाईल.

*ई-मोजणी २.०* : मोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल.

*3.जमिनीशी संबंधित महत्त्वाचे फेरफार आणि दुरुस्ती*

​ *अभिलेख दुरुस्ती* : ७/१२ मधील चुका दुरुस्त करण्यासाठी ‘मदत कक्ष’ (Help Desk) स्थापन केला जाईल.

​ *प्रलंबित फेरफार* : नगर भूमापन आणि गावठाण भूमापनाशी संबंधित प्रलंबित फेरफार प्रकरणे शिबिरातच निकाली काढली जातील.

*​कमी-जास्त पत्रके:* भूसंपादन किंवा अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणांमध्ये प्रलंबित असलेली कमी-जास्त पत्रके तयार करून रेकॉर्ड अद्ययावत केले जाईल.

​ *4. महसूल कायद्यातील सुधारणांची माहिती*

​ अकृषिक (NA) परवानगी

तुकडेबंदी कायदा

​ *५. एक खिडकी योजना* (Single Window Clearance)

​ *६. सामाजिक लाभ आणि विद्यार्थी साहाय्य*

​दाखले वाटप, अर्थसहाय्य योजना

कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर वाटप करण्यात आले आहेत.

आजच्या या अभियानाला माजी आमदार तोताराम कायंदे,तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, कृषी अधिकारी भुते,पुरवठा निरीक्षक फाळे, सहायक पोलीस निरीक्षक मातोंडकर, भूमी अभिलेख मुख्यालय सहायक मारोती थोरवे, गोपाल वाघमारे, राजाराम चोखट, प्रकाश शिंदे, श्रीकांत बुलबुले, आयुष नायगावकर, मंडळ अधिकारी संतोष गायकवाड साहेब, ग्राम महसूल अधिकारी विष्णु थोरात, श्रीमंत पांडव, प्रविण झिने, शिवानंद सनाप, ब्रम्हदेव साळवे, रामकृष्णन जाधव, साहिल देशमुख तसेच महसूल सेवक विठ्ठल घोंगे, ज्ञानेश्र्वर ढाकणे, रमा म्हस्के, कोमल ताठे,महसूल सहाय्यक मनोहर चके, ज्योती बारवाल, श्रीकृष्ण शिंगणे, इंगोले साहेब, संजय सोनुने,तसेच पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच इत्यादी उपस्थित होते.