Home Breaking News अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन सख्या जुळ्या बहिणीची गळा चिरून हत्या! ...

अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन सख्या जुळ्या बहिणीची गळा चिरून हत्या! नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप मुलींचा बळी .

2517

सुनिल अंभोरे प्रतिनिधी

अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हृदय पिळून टाकणारी घटना उघडकीस आली. बापाने नवरा बायकोच्या वादात सख्या दोन जुळ्या बहिणीच्या गळ्यावर चाकूने वार करून दोघींची हत्या केली.वाशिम जिल्ह्यातील रुई येथील रहिवासी सध्या पुणे येथे खासगी कंपनीत कामाला असलेल्या राहुल चव्हाण यांनी आपल्या दोन जुळ्या मुलीचा गळा कापून खून केला व मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी केला. या हृदय पिळून टाकणाऱ्या घटनेने बुलढाणा जिल्हा हादरून गेला आहे. घटनेचे सविस्तर वृत्त असे की, आरोपी राहुल शेषराव चव्हाण वय 33 वर्ष राहणार रुई तालुका मानोरा जिल्हा वाशिम हा पत्नी व दोन जुळ्या मुलीसह पुणे येथे खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पत्नीसोबत त्याचा वाद झाल्याने त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर त्याने दिनांक 21- 10 -2025 रोजी पोलीस स्टेशन अंढेरा हद्दीतील अंढेरा शिवारात महामार्गावर येथे दोन मुलींना घेऊन तो दुचाकीने पुण्यावरून आपल्या गावी वाशिम जिल्ह्यातील रुई या ठिकाणी जात असताना प्रवासादरम्यान पत्नीवरील रागाच्या भरात अंढेरा फाट्याजवळील जंगलात आपल्या दोन जुळ्या मुलीचा गळा कापून निर्गुण खून केला व मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. नमोद आरोपी हा त्याचे मूळ गाव रुई जिल्हा वाशिम येथे जाऊन घडलेली घटना नातेवाईक यांना सांगून तो पोलिस स्टेशन आसेगाव जिल्हा वाशिम येथे हजर होऊन, घटनेची माहिती दिली असता पोलीस स्टेशन आसेगाव चे प्रभारी अधिकारी हे त्यांचे स्टाफ सह पोलीस स्टेशन अंढेरा पोलिसांनी अंढेरा फाट्याच्या परिसरात पाहणी केली .घटनास्थळी डीवायएसपी मनीषा कदम संतोष खराडे अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे ,पोलीस उपनिरीक्षक जारवाल, पोलीस कर्मचारी पोफळे, फूसे, जाधव पोहोचले असता आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी शोध घेतला असता दोन मुलीचे सडलेल्या अवस्थेतील प्रेत मिळून आले. पंचनामा करून फॉरेन्स टिमला बोलून पुढील कारवाई करण्यात येत आहे. या हृदय पिळुन टाकणाऱ्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून दोन लहान निरागस निष्पाप मुलींचा जीव नवरा बायकोच्या वादातून गेला हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.