बुलडाणा चौफेर न्यूज सुनिल अंभोरे प्रतिनिधी
अवैध धंद्यावर अंढेरा पोलीस स्टेशनची स्टेशनच्या हद्दीत धडक कार्यवाही सुरू आहे. यातच दिनांक 18- 08- 2025 रोजी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध्य धंद्यावर कारवाई करण्याकरीता ठाणेदार स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना ग्राम शेळगाव आटोळ शेत शिवारातील पाझर तळावाजवळ रेणुका संजय मोरे , मीना किशोर वानखेडे दोन्ही राहणार शेळगाव आटोळ ही मोठ्या प्रमाणात हातभट्टी तयार करत असलेल्या बाबत माहिती मिळाल्याने ठाणेदार यांनी स्टाफ सदर ठिकाणी रेड केली असता सदर ठिकाणी एकूण 180 लिटर मोहासडवा एकूण किंमत 37 हजार दोनशे रुपयांचा हातभट्टी दारूचा मुद्देमाल मिळून आला असून सदरचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे. सदरची कारवाई माननीय निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा माननीय अमोल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा ,माननीय श्रीमती मनीषा कदम उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अंढेराचे ठाणेदार सपोनी रुपेश शक्करगे ,पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल, पोह सिद्धार्थ सोनकांबळे, चालक मपोशि अमोल रोरे यांनी केली. सदर कार्यवाहीने अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.






