Home आपला जिल्हा शेतकऱ्याचा साथीदार बैल राजाचे पुजन यावर्षी घरीच ,लंपी रोगाचे नियम पाळत पोळा...

शेतकऱ्याचा साथीदार बैल राजाचे पुजन यावर्षी घरीच ,लंपी रोगाचे नियम पाळत पोळा साजरा.

477

बुलडाणा चौफेर : सुनिल अंभोरे प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी आज बैलपोळा सणावर लंपी रोगाचे सावट दिसले. प्रशासनाने शेतकऱ्यांना सुचेना तथा आवाहन केले होते की, बैलावर लंपी नावाचा रोगाची लागण होत असल्यामुळे यावर्षी पोळ्याचा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता आपल्या घरात शेतकऱ्यांनी बैलाची पूजा करावी जेणेकरून दुसऱ्या जनावरांना या रोगाची लागण होणार नाही आपले बैलही सुरक्षित राहतील या सुचेना तथा आव्हानाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी यावर्षी बहुतेक बुलढाणा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पोळा साजरा न करता आपापल्या घरी शेतकऱ्यांनी बैलाची पूजा केली. वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा देत राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या बैल राजाच्या आज उत्सवाचा सण. आजच्या दिनी सकाळपासूनच बैलांच्या सेवेत शेतकरी राजा राहतो.आपल्या बैलाची सकाळीच आंघोळ करून भरपूर प्रमाणात त्यांना खाद्य दिल्या जाते. दुपारी त्याचा साज, शृंगार करून गावांमध्ये बैलाला मानाच्या तोरणाखालुन काढुन पारावरील मारुतीच्या मंदिराचे दर्शन घेऊन घरोघरी बैलाची पूजा आणि त्याला नैवेद्य दाखवल्या जातो. त्याच्या परी आत्मीयता ,प्रेम ,सहकार्य दाखवून आजच्या दिनी त्याचे ऋण मानले जातात. परंतु लंपी आजारामुळे आजच्या आनंदाच्या क्षणाला बैलपोळा सणावर सावट पसरलेले दिसले. शेतकऱ्यावर आलेल्या सुलतानी आणि अस्मानी संकटामुळे पहिलाच शेतकरी मेरकुटीला आलेला आहे. त्यातच यावर्षी त्याला जीवाला जीव देऊन सहकार्य, साथ देणाऱ्या बैलावरही लंपी रोगाचे सावट आले. तरीही शेतकरी राजाने हार न मानता वर्षभर अनेक संकटे झेलत आपल्या सहकार्याला बैल राजाला त्याचा मान, सन्मान करून त्याचे आभार मानले, ऋण व्यक्त केले. त्याच्या प्रती आदर व्यक्त केला. बैल राजाने ही आजच्या दिनी शेतकरी राजाची अडचण ओळखून जणू काही शेतकऱ्याला जन्मभर आमच्यावर कितीही संकटे आले तरी आम्ही शेतकरी राजाची साथ सोडणार नाही याची साथ देण्याची जणुकाही हमीच दिली. धन्य तो शेतकरी राजा आणि धन्य ते त्याला सहकार्य करणारा बैल राजा.