Home Breaking News अंढेरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, मोबाईल चोरास मुद्देमाला सह अटक.

अंढेरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, मोबाईल चोरास मुद्देमाला सह अटक.

559

बुलडाणा चौफेर ; सुनील अंभोरे प्रतिनिधी

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपरी आंधळे येथील योगेश बबन आंधळे यांनी दिनांक २३ ऑगस्ट २९२५ रोजी दिलेल्या तोंडी रिपोर्टनुसार अप क्रमांक 236/2025 कलम 303 (2) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करून अंढेरा पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज,मोबाईल टावर लोकेशन व गुप्त बातमीदारा मार्फत काही तासातच सदर गुन्ह्यातील आरोपी गजानन वाघ वय वर्ष २४ राहणार गवळीपुरा चिखली व एक विधी संघर्ष बालकास ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील स्कुटी क्रमांक एम.एच २८ बी झेड ०१७१ व स्कुटीच्या डिक्की मधील ६ मोबाईल मिळून आले मोबाईल बाबत पोलिसांनी विचारपूस केली असता अंढेरा फाट्यावरील पेट्रोल पंपावरून २ मोबाईल,देऊळगाव राजा येथून ३ मोबाईल व चिखली येथून १ मोबाईल चोरी केल्याचे सांगितले.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, एसडीपीओ मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे,पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल,पो.का सिद्धार्थ सोनकांबळे,नितीन फुसे,किशोर जाधव,माधुरी इंगळे यांनी केली.