Home आपला जिल्हा साखरखेर्डा गावात काही चुकून अनुचित प्रकार घडला की त्याचे फळ इतरांना भोगावे...

साखरखेर्डा गावात काही चुकून अनुचित प्रकार घडला की त्याचे फळ इतरांना भोगावे लागते उप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांचे प्रतिपादन.

363

बुलडाणा चौफेर न्युज

साखरखेर्डा
गावातच गोडवा असेल तर गावातील नागरिक सुध्दा चांगले असतात . एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याचे फळ इतरांना भोगावे लागतात. त्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन सण उत्सव साजरे करावे असे प्रतिपादन जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी साखरखेर्डा येथील शांतता कमेटी , गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त मिटींग मध्ये केले .
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव , ठाणेदार गजानन करेवाड , माजी उपसभापती सुनील जगताप , रामदाससिंग राजपूत , माजी सरपंच कमलाकर गवई , माजी उपसरपंच सय्यद रफीक यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमेटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
गणेश उत्सव ही परंपरा लोकमान्य टिळक यांनी सुरू केली . त्यांचा मुळ उद्देश हा होता की नागरिकांनी संघटीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावे . आज गणेश उत्सव साजरा करताना मंडळांनी समाज प्रबोधन कसे करता येईल यासाठी पुढाकार घेतला पाहिजे . गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन येणाऱ्या पिढीला सुध्दा प्रोत्साहन मिळाले पाहिजे की पुढील वर्षी माझाही सत्कार झाला पाहिजे . यासाठी तो प्रयत्न करेल . हिंदू , मुस्लिम अनुयायी कधीच दोन समाजात तेढ निर्माण होईल हे शिकवीत नाही . एकमेकांची डोकी फोडून काहीही साध्य होत नाही . त्यासाठी हिंदू – मुस्लिम समाजाने येणारे सण , उत्सव आनंदाने साजरे करावेत , भाईचारा निर्माण करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले .
साखरखेर्डा येथे कावड यात्रा शांततेत पार पडली , त्याबद्दल सर्व मंडळाचे अभिनंदन करीत येणारे सण उत्सव साजरे करताना पोलिसांना सहकार्य केले पाहिजे . केवळ किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला नाही पाहिजे . असे मार्गदर्शन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केले . रामभाऊ जाधव यांनी ग्रामस्थांच्या वतीने बोलताना दोन्ही समाजांच्या वतीने येणारे सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे केल्या जातील , काही दोन टक्के युवक गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आवर घालण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे . असे आश्वासन दिले . यावेळी सय्यद रफीक , अर्जून गवई यांनी आपले विचार मांडले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन करेवाड यांनी केले तर संचालन प्राचार्य संतोष दसरे यांनी केले .
यावेळी सरपंच पती अमित जाधव , संग्रामसिंह राजपूत , गोपाल राजपूत , संतोष राजपूत , संतोष मंडळकर , ग्राम पंचायत अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे , सर्व पोलीस पाटील उपस्थित होते .