बुलडाणा चौफेर न्युज
बुलढाणा जिल्ह्यातील मौजे अमडापूर लव्हाळा दुसर बीड राहेरी वरदडी रोड राष्ट्रीय हायवे क्रमांक 222 च्या साखरखेर्डाचे दुसरबीड कडे सुरू असलेल्या रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून संबंधित ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विशाल गवई यांनी दिनांक 30 जुलै रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे,
सध्या साखरखेर्डा ते दुसर बीड या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे या अगोदर सुद्धा अनेक प्रसारमाध्यमांमध्ये सदर कामाबाबत बातम्या प्रकाशित झाल्या होत्या कुठल्याही प्रकारची मुरूम किंवा इतर खोदकाम न करता त्यामध्ये काळी माती लाल माती टाकण्याचे प्रकार उघडकीस आले होते, त्यामुळे विशाल गवई यांनी केलेल्या तक्रारीला महत्त्व प्राप्त झाले असून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांनी सुद्धा उचित कारवाई करणार असल्याचे पत्र दिले आहे .







