बुलडाणा चौफेर न्यूज : अकोला प्रतिनिधी प्रणय गवई
द्यानिकेतन इंग्लिश स्कूल नेरपिंगळाई येथे गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये नर्सरी ते वर्ग 7 वी पर्यंतचे विद्यार्थी राधा कृष्ण यांच्या भूमिकेमध्ये आले होते तर काही विद्यार्थ्यांनी गोकुळाष्टमी वर आधारित उत्कृष्ट नृत्य प्रस्तुत केले. तसेच वर्ग 5वी ,6 वी ,7वी च्या मुलांचा दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वर्ग 5 वी,6 वी,7 वी च्या मुलांनी मनोरा उभारला आणि हार्दिक पांडे वर्ग 3 रा याने दहीहंडी फोडली . या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी होते.
तसेच या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सिद्धांत दाभेकर सर तसेच सर्व शिक्षक रुख्मिणी निंबेकर मॅडम, शितल काकस मॅडम, प्रिया झोडगे मॅडम, निकिता संभे मॅडम,श्रद्धा पांडे मॅडम, रोशनी भालेराव मॅडम, अनुराधा मोरस्कर मॅडम,सायली इंगळे मॅडम, मयुरी बुरंगे, प्रतिक्षा कोहळे, अशनिया मॅडम, निखिल माकोडे सर, तसेच्या शाळेच्या क्लर्क उपरीकर ताई उपस्थित होत्या . तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.






