Home Breaking News झालेल्या विकास कामाचा निकृष्ट दर्जा, हेच माधवरावांना डोकेदुखी ठरणार

झालेल्या विकास कामाचा निकृष्ट दर्जा, हेच माधवरावांना डोकेदुखी ठरणार

325

दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी /-

महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणुक येत्या २० नोव्हेंबर या तारखेला पार पडणार असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचार करत असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फेऱ्या झाडत असून आम्हीच विकास कामे केली असल्याचे ठासून सांगत आहेत.

असाच काहीसा दावा हदगाव -हिमायतनगर विधानसभेमध्ये देखिल विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर याच्याकडून केला जात आहे.
हदगाव -हिमायतनगर विधानसभेचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मतदार संघात जी विकासकामे झाली आहेत त्यातून मतदार संघातील नागरीकांना सोई सुविधा पुरविल्याचे  ठासून सांगत आहेत . जी विकास कामे केली गेली आहेत व प्रगतीपथावर आहेत ती कामे बहुतांश ठिकाणी निकृष्ट दर्जाची केल्याचे दिसून येत आहे.

अनेक ठिकाणची कामे आपल्या मर्जीतील  कंत्राटदाराला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्यामुळे कामाचा दर्जा ढासळला. कामे निकृष्ट दर्जाची केल्याने हिमायतनगर तालुका विकासापासून वंचित राहिल्याचे दिसून येते. हदगाव -हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात झालेले निकृष्ट दर्जाची कामे विद्यमान आमदार व काँग्रेसचे उमेदवार जवळगावकर यांची डोकेदुखी वाढवणार अशी चर्चा जनतेमध्ये बोलल्या जात आहे.