Home Breaking News उत्तम गायकवाड यांचा हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल

उत्तम गायकवाड यांचा हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल

216

 

दाऊ गाडगेवाड हदगाव प्रतिनिधी /-

हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील पळसपुर या गावचे रहिवासी असलेली उत्तम रामा गायकवाड यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी हदगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे.

उत्तम रामा गायकवाड यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये ही उत्तुंग भरारी घेतली असून स्वबळावर त्यांनी आपली वेगळी प्रतिमा बनवली आहे.

मतदारसंघामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून विविध सामाजिक उपक्रमांमधून ते जनसेवा करण्याचे कार्य करतात.
यावेळी बोलताना उत्तम गायकवाड म्हणाले की पक्षाच्या व घराणेशाही च्या राजकारणाला जनता कंटाळली असून आता अपक्षाचे सरकार नक्कीच येणार.

घराणेशाही पालटण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरला असून मला विश्वास आहे की जनता नक्कीच मला पाठिंबा देईल.