Home Breaking News आर्य-वैश्य समाजाच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याला निवेदन ‘त्या’ घरफोडीचा अद्यापही उलगडा नाही

आर्य-वैश्य समाजाच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याला निवेदन ‘त्या’ घरफोडीचा अद्यापही उलगडा नाही

230

✒️बबलू भालेराव ✒️

उमरखेड ता. प्रतिनिधी
मो 9637107518

उमरखेड, (श.प्र.). भरदिवसा 18 दिवसापूर्वी आर्य-वैश्य समाज बांधवाकडे लाखोंची चोरी झाली होती. या घटनेतील आरोपीस अद्याप अटक न झाल्यामुळे लवकरात लवकर कारवाई व्हावी. याकरिता आर्य-वैश्य समाजाच्या वतीने सोमवारी (दि. 21) उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. येथील श्रीकांत जनार्दन मामीडवार यांच्या घरी 3 ऑक्टोबर रोजी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन घरातील मौल्यवान वस्तू व रोख लंपास केली. याप्रकरणी उमरखेड पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरटया विरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनेला आज 18 दिवस झालेले असतांना देखील अद्यापपर्यंत यंत्रणेला

गुन्हेगारांना पकडण्यास यश आलेले नसून, व्यापारी बांधव मोठ्या प्रमाणात दहशतीत आहेत.

त्यामुळे या निवेदनाद्वारे स्थानिक आर्य वैश्य समाज अध्यक्ष व सर्व समाज बांधवांच्या वतीने सोमवारी रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना संबंधीत घटनेतील गुन्हेगाराचा तत्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशा

• आरोपीला लवकरच अटक केल्या जाईल गुन्हा कुठलाही छोटा अथवा मोठा नसतो आणि गुन्हेगाराच्या शोधात विशेष पथके देखील काम करीत आहे. लवकरच गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात येतील कुणीही गैरसमज करून घेऊ नये.

हनुमंत गायकवाड, उपविभागीय पोलिस

अधिकारी

आशयाचे निवेदन सुरेंद्र कोडगिरवार, डॉ. गजानन कोडगीरवार, व्यंकटेश पेन्शनवार, सचिन निलपवार, महेश पत्तेवार, डॉ. चंद्रकांत निलपवार, उदय पत्तेवार, संजय गुजलवार, वैभव कोडगिरवार, रितेश नीलावार, नंदकुमार पेन्शनवार, प्रदीप पत्तेवार, डॉ. धनंजय व्यवहारे, गजानन लंकेपिल्लेवार यांच्यासह अनेक समाज बांधव यांनी दिले.