दररोज खिचडी प्रसादाचे वाटप
कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट
श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात कायम अग्रेसर असलेल्या चैतन्य भाऊ आल्हाट मित्र मंडळाच्या वतीने यंदा सप्तशृंगी माता नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दिनांक ३ ते १२ ऑक्टोंबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध मान्यवरांच्या हस्ते आरतीचे आयोजित करण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता उत्कर्षा ताई रुपवते यांच्या हस्ते आरती करण्यात आलीयावेळी राहुरी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके हेही आरतीला उपस्थित होते
सप्तशृंगी माता नवरात्र मंडळाच्या वतीने वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.या निमित्ताने स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
सप्तशृंगी माता नवरात्र उत्सव मंडळ
प्रसादनगर राहुरी फॅक्टरी आयोजित
दि. ७/१०/२०२४ रोजी वंचित बहुजन आघाडीचे राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष चैतन्य भाऊ आल्हाट आयोजीत खिचडी महाप्रसाद आयोजन करण्यात आले
दि. ९/१०/२०२४ रोजी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता उत्कर्षा ताई रुपवते यांच्या हस्ते आरती संपन्न झाली
तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहुन व स्पर्धांमध्ये सहभागी झाले व दररोज महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय नेतेमंडळींनी या महाप्रसादाच्या व आरतीच्या कार्यक्रमास हजेरी लावली आहे






