Home Breaking News उमरखेड शहरात शस्त्र घेवुन रिल्स बनविणार्‍याला अटक:

उमरखेड शहरात शस्त्र घेवुन रिल्स बनविणार्‍याला अटक:

218

= रिल्स प्रसारीत न करण्याचे पोलिसांचे आवाहन र्‍

✒️बबलू भालेराव ✒️
उमरखेड ता.
प्रतिनिधी
मो 9637107518

सध्या समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रकारच्या रिल बनवुन भाईगीरी करणा-याचे मोठया प्रमाणात तरुणाईमध्ये फॅड निर्माण झाले आहे.अशाच एका तरुणाला काल दिनांक ३० सप्टेंबर रोजी उमरखेड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी या घटनेची रिल कुणीही प्रसारीत करू नये असे आवाहन केले आहे .

या घटनेतील ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे शेख गौस शेख करीम (२५) रा. नागापुर रुपाळा ता . उमरखेड असे नाव असून त्याने हातात धारदार शस्त्र घेवुन रिल बनवुन इस्टाग्रॉमवर रिलीज करून प्रसारमाध्यमावर प्रसारीत केली . या घटनेची माहिती त्वरीत पोलिस प्रशासनाला मिळाली .

 

पोलीस दल अशाप्रकारे भाईगीरी करणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांच्या कृत्यावर लक्ष ठेवुन असतात. यामुळे काल दि.३०/०९/२०२४ रोजी सपोनि भगत यांना पो.स्टे.ला हजर असताना गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, सोशल मिडीयावर एक व्हीडीओ व्हायरल होत असुन त्यामध्ये एक ईसम हातात एक धारदार चाकु घेऊन रिल्स बनवुन ईन्स्टाग्रामवर व्हायरल केला आहे. व सदर इसम हा धारदार चाकु गुन्हेगारी कृत्य करायाच्या दृष्टीने सतत सोबत बाळगुन असतो. अशा खात्रीशीर माहीतीवरून, सदर इसम शेख गौस शेख करीम वय-२५ वर्षे व्यवसाय मजुरी रा. नागापुर रुपाळा ता. उमरखेड जि. यवतमाळ हा निष्पन्न करण्यात आला. व तो उमरखेड शहरात हजर असल्याचे समजले. यावरुन सपोनि कैलास भगत सोबत परि. पोउपनि सागर ईंगळे, पोकों टेंबरे तसेच सोबत दोन पंचसह कार्यवाही साठी रवाना झालेअसतांना. मिळालेल्या माहीतीप्रमाणे तो मिळुन आला. त्याची ओळख पटवुन त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव शेख गौस शेख करीम वय-२५ वर्षे व्यवसाय मजुरी रा.नागापुर रुपाळा ता. उमरखेड जि. यवतमाळ असे सांगितले पंचामक्ष त्याची झडती घेतली असता त्याचे जवळ एक चाकु लाल काळया रंगाची लाकडी मुठ असलेला ज्याची लांबी टोकापसुन मुठीपर्यंत पात्याची लांबी चार ईंच व मुठीची लांबी पाच ईच पात्याची मध्यभागी रुंदी एक ईच बटण दाबल्यावर चालु बंद होणारा जुना वापरता चाकु किंमत अंदाजे २५०/रुपये तसेच एक ओप्पो कंपनीचा आकाशी रंगाचा जुना वापरता मोबाईल किंमत अंदाजे ८००० रुपये मिळुन आले.

सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक ,पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक , उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड , प्रभारी अधिकारी सपोनि कैलास भगत, यांचे मार्गदर्शनात परि. पोउपनि सागर इंगळे, पोशि संघशील टेंभरे, यांनी केली आहे.

चौकट :

तरुणांनी गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन करणारे व भाईगीरी करणारे व हातात घातक शस्त्र घेवुन समाजात भीती निर्माण करणारे रील्स बनवुन समाजमाध्यमावर प्रसारीत करुन, समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये .
अन्यथा याचे उल्लघन करणा-यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल .

संजय सोळंके

पोलीस निरीक्षक । उमरखेड.