नागोराव शिंदे
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भामध्ये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार हिमायतनगर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार सौ पल्लवी टेमकर हिमायतनगर सज्याचे मंडळ अधिकारी बी.एम चव्हाण पळसपुर सज्याचे तलाठी एस बी जावरकर यांनी आज पैनगंगा
नदी काठावरील पळसपुर, डोलारी, या ठिकाणी येऊन जाय मुख्यावर शेती नुकसानीची पाहणी केली असून यावेळी शेतकऱ्यांना तहसीलदार टेमकर यांनी सूचना दिल्या कि आपले मंडळ अधिकारी तलाठी सर्वे करतील आणि आणि तालुक्याच्या
ठिकाणी नुकसान झाल्याच्यासाठी कोणीही चकरा मारण्याची गरज नसून मि माझ्या स्तरावर माझ्या तिन मंडळात शेति नुकसानीचे पंचनामाचे आदेश काढले असून त्यानुसार पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तिन्ही मंडळ हे अतिवृष्टी मध्ये आहेत अशा सूचना दिल्या असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे आहे आहोत आणि शेतकऱ्यांचे कोणतेही
नुकसान आमचे हातून होणार नाही असे तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना बोलताना सांगितले आहे यावेळी पळसपुर, डोलारी,येथील शेतकरी सदाशिव वानखेडे,दिलीप साळवे ,यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते






