✒️बबलू भालेराव ✒️
(उमरखेड ता. प्रतिनिधी )
मो 9637107518
उमरखेड दिनांक 02/09 2025 रोजी बालदी येथे
सरत्या श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्याला येणारा सण म्हणजे बैलपोळा संपूर्ण राज्यभरामध्ये पोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो.
वर्षभर राब राबणाऱ्या बैलांना विश्रांतीचा दिवस असतो या दिवशी शेतकरी बैलांना कुठल्याही प्रकारची काम लावत नसतात, ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलाची पूजा करतात या दिवशी बैलपोळ्यामध्ये बैलाला त्यांची शोभा वाढविण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने सजवतात.बाळदी येथे दोन दिवस बैलपोळा भरल्या जातो.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तांडावस्ती कडून पोळ्याची सुरुवात झाली होती त्यानंतर सर्व शेतकरी आपली बैल जोडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान येथे जमतात व लागूनच हनुमान मंदिर आहे तेथे सर्व शेतकरी आपल्या बैल जोडीला घेऊन वेडा देतात आणि नंतर तेथून पोळ्याची सांगता केली जाते यावेळी पोलीस प्रशासनाचे कर्तव्यदक्ष भूमिका बजावणारे सुदर्शन जाधव यांच्या उपस्थित बैलपोळा शांततेत पार पडला.
गावातील पत्रकार अतिश वटाणे, प्रहार शाखा अध्यक्ष प्रविण इंगळे, अनिल बोंद्रे अंकुश मिराशे अनिल भोसले पोलिस पाटील, इतर समाजसेवक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






