Home Breaking News पंचशिल शाळेत गुणवत्ता शोध परीक्षेचे बक्षीस वितरण संपन्न*

पंचशिल शाळेत गुणवत्ता शोध परीक्षेचे बक्षीस वितरण संपन्न*

96

दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी /-

आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड व पंचशील विद्यार्जन माध्यमिक व उच्च मा. विद्यालय, हदगाव यांच्या वतीने आयोजित शोध प्रज्ञावंतांचा या परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ थाटात पार पडला.

आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेडच्या वतीने दरवर्षी शोध प्रज्ञावंतांचा ही गुणवत्ता शोध परीक्षा आयोजित केली जाते. एप्रिल २०२४ मध्ये आयोजित केलेल्या या परीक्षेत हदगाव आणि परिसरातील जवळपास ४ ते ५ शाळांनी सहभाग नोंदविला होता.

यातून पंचशील विद्यार्जन माध्यमिक व उच्च मा. विद्यालय मधील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सानिका गजानन कदम हिने ६१ गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकाविल्याने तिला सन्मानपत्र व रोख १०००/- रु देऊन सत्कार करण्यात आला, इयत्ता नऊवीची विद्यार्थिनी संचिता गजानन गुदाल हिने ७४ गुण पटकावून तृतीय क्रमांक पटकाविल्याने तिला

सन्मानपत्र व रोख ५००/- रु देऊन सत्कार करण्यात आला, इयत्ता दहावीची विद्यार्थिनी श्रद्धा प्रभाकर कदम हिने ५३ गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविल्याने तिला सन्मानपत्र व रोख ५००/- रु देऊन सत्कार करण्यात आला, इयत्ता दहावीमधील तनुजा विठ्ठल कदम या विद्यार्थिनीने गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे त्यांचा गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. बेंड्रेवार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवशाहीर, शिवव्याख्याते शिवश्री गजानन जाधव हे होते.

पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक व परीक्षा आयोजनामागील भूमिका प्रा. शंकर माने यांनी विशद केली. शिवश्री गजानन जाधव यांनी या परीक्षेचे स्वरूप व आयोजन याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजय चव्हाण यांनी केले.

तर आभार आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव डॉ. सौरभ माधवराव जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास विशेष सहकार्य स्थानिक संयोजन समितीतील प्रा. अर्जुन नरवाडे, प्रा. सुनील खिल्लारे, श्री विकास जाधव, श्री निलेश जाधव यांनी केले. तर यावेळी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.