Home आपला जिल्हा मेरा बुद्रुक चे सुपुत्र विलास अण्णा डोंगरदिवे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड..!...

मेरा बुद्रुक चे सुपुत्र विलास अण्णा डोंगरदिवे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड..! वाद्य आणि गुलालात गावातून धुमधडाक्यात मिरवणूक ..

725

बुलडाणा चौफेर : सुनिल अंभोरे प्रतिनिधी 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील सुपुत्र विलास अण्णा डोंगरदिवे यांची यावर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात ठाणे शहर पोलीस पदासाठी निवड झाली आहे. गरीब कुटुंबातील आई-वडील अत्यंत काबाडकष्ट करून आपल्या मुलाला पदवीपर्यंत शिक्षण दिल, विलासनेही अत्यंत चिकाटी आणि मेहनतीने शिक्षण पूर्ण केले.शिक्षण चालू असतानाच विविध विभागातील पदासाठी भरतीसाठी दोन ते तीन वर्ष सलग प्रयत्न करीत राहिला. सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी घेऊन चळवळीमध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये भाग घेत राहिला. आणि एक दिवस त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळले. साडेतीन वर्षे सतत व्यायाम, प्रचंड अभ्यास, अभ्यासाचे सातत्य , जिद्द, चिकाटी, मेहनत, आणि सतत प्रयत्न या गुणाचा अवलंब करून या युवकाने गरिबीवर मात करत,

कोणत्याही प्रकारचा नोकरीचा घरामध्ये वारसा हक्क नाही, आई-वडील अशिक्षित, तरीही या युवकाने इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम ठेवत ओपन कॅटेगिरी मधून यश संपादन करून ठाणे शहर पोलीस या पदावर निवडीस पात्र ठरलेला आहे. प्राथमिक शिक्षण गावात तर महाविद्यालय शिक्षण चिखली येथे झाले. फार कमी दिवस कोचिंग क्लासेस लावले होते संपूर्ण अभ्यास व सराव घरीच त्यांनी केला होता. या अगोदर भारतीय सैन्य दलामध्ये व मागच्या पोलीस भरतीच्या वेळेस वेटिंग लिस्ट मध्ये अगदी जवळून संधी हुकली होती. एम एस एफ मध्ये निवड होऊनही त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाकडे लक्ष केंद्रित करून आपल्या आई-वडिलांचे व आपले स्वप्न पूर्ण केले. दमदार खाकी वर्दी चे स्वप्न उराशी बाळगून जिद्दीने स्वप्न पूर्ण केले. पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल गावामधुन जिवलग मित्रांनी व गावकऱ्यांनी थाटात त्याची मिरवणूक काढण्यात आली. मुलाचं यश आणि गावकऱ्यांचा उत्साह पाहता आई-वडील भाऊक झाले होते. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. मात्र चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास, आनंद दिसत होता. मुलाचा यश हेच आई वडिलांचे सर्वात मोठे यश असतं हे या प्रसंगावरून नक्कीच दिसते. आपल्या यशाचे श्रेय तो बाबासाहेबांचे विचार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ,त्याचे आई-वडील ,भाऊ, शिक्षक व यशस्वी मित्र यांना देतो. यापुढील जीवनातही मी सामाजिक कार्यात तसेच नवीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तसेच मदतगार बनेल असे त्यांनी यावेळी सांगितले. या यशस्वी युवकाचा बाकीचे विद्यार्थी नक्कीच आदर्श ,प्रेरणा घेतील यात काही शंका नाही. जिद्द, चिकाटी, मेहनत,सराव, सातत्य या गुणाचा वापर करून यशस्वी होऊ शकतो हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे. पोलीस दलात निवड झाल्यामुळे विविध स्तरातून त्याच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.