बुलडाणा चौफेर : भोकरदन (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डॉ. राजू साळवे यांची भोकरदन विधानसभा क्षेत्रासाठी SIR (मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियान) प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती संघटनात्मक पातळीवर BLA-1 पदासाठी अधिकृत पत्राद्वारे जाहीर करण्यात आली.
मतदार याद्यांचे अचूक पुनर्निरीक्षण करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरावर कार्य अधिक सक्षम करणे, हा या नियुक्तीमागील मुख्य उद्देश असल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगण्यात आले.
ही निवड रावसाहेब दानवे व संतोष दानवे यांच्या शिफारसीवरून करण्यात आली असून, पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या निवडीबद्दल नारायण कुचे (जिल्हाध्यक्ष), चेअरमन विजय परिहार, नाना भागिले, गोविंद पंडित, संतोष लोखंडे, शालिकराम म्हस्के, मधुकर पाटील गाढे, भाऊसाहेब जाधव, साहेबराव कानडजे, सुधीर पाटील, दगडूबा गोरे, मनोज शिंदे, गजानन घाटगे, कडूबा पाटील शितोळे, शांताराम गव्हाणे आणि उद्धव दूनगहू यांनी डॉ. साळवे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. राजू साळवे यांनी या नियुक्तीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून, “पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत भोकरदन विधानसभा क्षेत्रात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.






