✒️ बबलू भालेराव✒️ (उमरखेड तालुका प्रतिनिधी)
मो. 9637107518
उमरखेड (दिनांक ७ ऑक्टोंबर) रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी उमरखेड येथील जिजाऊ भवन येथे लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विजयराव खडसे, एडवोकेट समाज भूषण विश्वास भवरे, अग्निबाण लाईव्ह न्युज चॅनलचे संपादक डॉ.आंबेजोगाईकर, पत्रकार दत्तराव काळे, प्रा.अनिल काळबांडे, मारोतराव कदम,दीपक कांबळे साहेब, हे होते.आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार दत्तराव काळे हे होते.
प्रथमता आमदार नामदेवराव ससाने व मंचावरील मान्यवर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर आमदार नामदेवराव ससाने यांनी फीत कापून उद्घाटन केले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि ही पत्रकारिता कशी केली पाहिजे यासाठी मार्गदर्शन करून मान्यवरांनी लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलला भरभरून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या नंतर अल्पोपाराचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला पत्रकार दिलीप मुनेश्वर,पत्रकार सिद्धार्थ दिवेकर,पत्रकार विश्वास काळे, पत्रकार आतिश वटाणे पत्रकार प्रवीण इंगळे,पत्रकार राजू पिटलेवाड,पत्रकार शेख रमजान, ,पत्रकार संतोष वायकुळे व अनेक पत्रकार व निमंत्रित उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकहित लाईव्ह न्यूजचे संपादक विजय कदम यांनी केले.
सूत्रसंचालन पत्रकार संतोष आडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार राजेश कदम यांनी केले.






