Home Breaking News शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील...

शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शाळांना १ लाख वह्यांचे वाटप उपक्रम…

177

कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट

राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :

राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध शाळांमध्ये १ लाख वह्या वाटप करण्यात येणार आहे. शुक्रवारी राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय व छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या सहकार्यातून पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी १ लाख वह्या वाटप करण्यात येणार आहे. सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज तसेच सुरेगाव रस्ता येथे सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम येथे महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे आशीर्वाद घेऊन या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.

दरम्यान शुक्रवारी सकाळी राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय व छत्रपती शिवाजी हायस्कूल व प्रसाद नगर जिल्हा प्राथमिक शाळा अशा तिनीही शाळेतील १००० विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आला. यावेळी शांतीचौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, युवा उद्योजक ऋषभ लोढा, आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे, रामभाऊ काळे, प्रदीप गरड, प्राचार्य उत्तमराव खुळे, मुख्याध्यापिका सौ.आवारी मॅडम आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दीपक त्रिभुवन म्हणाले की, शांती चौक मित्र मंडळाच्याचे नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान राहिले आहे. १ लाख वह्या वाटपाचा संकल्प जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश सांबरे व उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास नेणार आहे.यापुढील काळात आम्ही जनतेच्या सेवेत नेहमीच उपलब्ध राहणार असल्याचे ते म्हणाले.
प्राचार्य उत्तमराव खुळे यांनी या उपक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमास प्रकाश सोनी, जयेश मुसमाडे, डॉ.रवींद्र वामन, दत्तात्रय दरंदले, डॉ.अनिल भाग्यवान, दत्तात्रय साळुंके, नितीन डंबाळे, रामेश्वर तोडमल, विजय सोनवणे, भास्कर कोळसे, किशोर कोबरणे, प्रितेश सोळुंकी, रंगनाथ घाडगे, अतुल त्रिभुवन, प्रदीप भगत,पंकज घोरपडे,महेश देसरडा, सचिन जाधव, प्रणय भोसले, ऋषभ संचेती, रोहित काळे,योगेश जाधव, साई त्रिभुवन आदी उपस्थित होते.