✒️ बबलू भालेराव✒️ (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9637107518
उमरखेड (दिनांक १५ सप्टेंबर)
तालुक्यातील पोस्ट पोफाळी येथे दि.१५ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. गणपती उत्सवामध्ये व येणाऱ्या ईद या दोन मोठ्या सणांमध्ये जातीय सलोखा राखण्यासाठी पोलीस स्टेशन पोफाळी व प्राथमिक रुग्णालय मुळावा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी हद्दीतील ग्रामपंचायत, पोलीस पाटील आशा वर्कर गणेश मंडळ कार्यकर्ते पत्रकार शिक्षक. खाजगी डॉक्टर पोलीस कर्मचारी व्यापारी व इतर अशा सर्व धार्मिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या रक्तदान शिबिरामध्ये १३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळेस पोफाळी पोलीस स्टेशनचे पंकज दाभाडे
यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात यावेळेस उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली.
व सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्म्यांनी एकत्र येऊन असे सामाजिक उपक्रम राबवावे व या कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.






