Home Breaking News राहुरी फॅक्टरी राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गणरायांची स्थापणा

राहुरी फॅक्टरी राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गणरायांची स्थापणा

177

कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट

राहुरी फॅक्टरी राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या मंडळाच्या वतीने विधिवत पूजा करून भव्य मिरवणुकीने व फटाक्यांच्या आतिषबाजीने मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना करण्यात आली.

यावेळी देवळाली प्रवारा नगर पालिकेचे मुख्य अधिकारी विकास नवाळे साहेब यांच्या हस्ते गणरायाचे विधीवत पूजन करण्यात आले

श्रीशिवाजीनगर व पंचक्रोशीतील तमाम गणेश भक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, सालाबादप्रमाणे याही वर्षी राजे छत्रपति युवा प्रतिष्ठान मंडळातर्फे गणेशोत्सवाचे दर वर्षी प्रमाने कार्यकमाचे आयोजन करण्यात आलेले असून गणेशभक्तांनी कार्यक्रमास अगत्य उपस्थित राहावे व मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही विनंती. मंडाळाच्या वतीने करण्यात आली
श्री मुर्तीची भव्य मिरवणूक व स्थापना, प्रमुख आकर्षण – नाशिक येथील प्रसिद्ध म्युझीकल लाईटींग आरस आहे तसेच मा.श्री. वैभव कलुबर्मे (अप्पर पोलिस अधिक्षक, श्रीरामपूर) व मा.श्री. विकास रमेश नवाळे साहेब (मुख्याधिकारी, देवळाली प्रवरा नगरपालिका) याचे शुभहस्ते श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आले यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते श्री ची आरती संपन्न झाली यावेळी विविध मान्यवरांचा व पत्रकारांचा सन्मान व सत्कार करण्यात आला