Home Breaking News जंगल व्याप्त शेतकऱ्यांना सौर झटका मशीन सुरक्षा कवच उपलब्ध करून द्या

जंगल व्याप्त शेतकऱ्यांना सौर झटका मशीन सुरक्षा कवच उपलब्ध करून द्या

215

( आजाद समाज पार्टीची मागणी )

✒️ बबलू भालेराव ✒️
(उमरखेड ता. प्रतिनिधी )
मो. 9637107518

दिनांक 06/09/2024
उमरखेड तालुक्यातील सर्व जंगलव्याप्त शेतकऱ्यांना शेतीला सौरचलित घटका मशीन व वनप्राण्यापासून सुरक्षा कवच उपलब्ध करून द्या अशी मागणी आजाद समाज पार्टीच्या वतीने मुख्य वन संरक्षक यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली,
तालुक्यातील सर्व जंगलव्याप्त शेतकऱ्यांना जंगली वन्य प्राण्यांपासून मोठे नुकसान होत असून त्यामुळे शेती पडित पडून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना आणि मोठा त्रास सहन करावा लागत आहे,

अगोदरच झालेली अतिवृष्टी व शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल भाव यामुळे शेतकरी त्रस्त आहेत अशातच जंगली प्राण्यांमुळे पिकांची होणारे मोठे नुकसान यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली जीवन जगत आहे यामुळे सर्वजण जंगल व्याप्त शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जाचलित झटका मशीन व शेतकऱ्यांना शेतामध्ये सुरक्षा कवच उपलब्ध करून द्यावं शेतकऱ्यावर हिंसक प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या जीवितहानीस वन विभाग जबाबदार राहील मागण्या तातडीने निकाली न काढल्यास मुख्य वनरक्षक कार्यालय यवतमाळ

यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे,
जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, उमरखेड तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव, उमरखेड शहराध्यक्ष प्रफुल दिवेकर, युवा तालुकाध्यक्ष विष्णुकांत वाडेकर, महासचिव सचिन वाहुळे, गौतम कांबळे, विनोद बर्डे, सुशांत धोंगडे आशीद भवरे, यांनी दिला