Home Breaking News उमरखेड शहरात आज रक्षाबंधन निमित्त सत्य निर्मिती महिला मंडळ या महिला संघटनेच्या...

उमरखेड शहरात आज रक्षाबंधन निमित्त सत्य निर्मिती महिला मंडळ या महिला संघटनेच्या वतीने अखिल भारतीय एकता आणि जातीय सलोखा

98

✒️बबलू भालेराव ✒️ उमरखेड तालुका प्रतिनिधी ) मो 9637107518

रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले उमरखेड शहरात विविध ठिकाणी जाऊन मुस्लिम आणि हिंदू भगिनींनी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला महाराष्ट्रातील एकमेव सत्य निर्मिती महिला मंडळ एक अशी संघटना आहे दर वर्षी जातीय सलोखा रक्षाबंधन चे कार्यक्रम घेते आज दहा वर्षापासून त्यांचे हे जातीय सलोखा कार्यक्रम सर्व राज्यात प्रसिद्ध आणि परिचित झाले आहे

महाराष्ट्र राज्यात कोणत्याही प्रकारच्या जातीवाद होऊ नये आणि महाराष्ट्रातील हिंदू आणि मुस्लिम हे भाउ भाउ बनवून नेहमी राहावे याकरिता सत्यनिर्मिती महिला मंडळ यांनी सण 2015 मध्ये जातीय सलोखा रक्षाबंधन कार्यक्रमाची सुरुवात केली सत्य निर्मिती महिला मंडळ चे अध्यक्ष सौ शबाना खान

यांनी महाराष्ट्रात राज्यात सामाजिक पाऊल माध्यमातून हे कार्यक्रम सुरू केले आणि आज ही ते कायम आहे या रक्षाबंधन कार्यक्रमात पोलीस स्टेशन तहसील विभाग पंचायत समिती इलेक्ट्रिक विभाग तसेच विविध विभागात जाऊन हिंदू आणि मुसलमान यांना राखी बांधण्यात येते रक्षाबंधन कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने मुस्लिम महिला भाग घेतात राज्यात

जातीय सलोखा कायम राहावा याकरिता सत्य निर्मिती महिला मंडळ हे नेहमी प्रयत्नशील असते आणि जातीय सलोखा रक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात आला यावेळी सत्य निर्मिती महिला मंडळ कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते सौ डॉ वंदना मसूळकर सौ रेहाना

सिद्धी सौ तबसूम सय्यद सौ आतिफा बानो सौ रेहाना दादू सौ मूवीना बानो सौ आसिफाबी सौ सविता भागवत सौ आनंदी पूरी कुमारी शैलजा सौ सविता निलेश पवार सौ निर्विला संतोष कदम सौकाकूडे सौ सीमा पठाण सौ शेख रेहाना अदी महिला व बांधव उपस्थित होते.