Home आपला जिल्हा तितिक्षा प्रमोद मातृगौरव पुरस्कारा साठी गजानन जाधव यांची निवड.

तितिक्षा प्रमोद मातृगौरव पुरस्कारा साठी गजानन जाधव यांची निवड.

348

बुलडाणा चौफेर : स्मिता उबाळे 

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा जवळच असलेल दोरवी गावचे सुपुत्र गजानन शंकर जाधव यांची तितीक्षा प्रमोद मातृगौरव पुरस्काराचे मानकरी.

पुणे येथील तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत कार्यरत असलेल्या तितिक्षा इंटरनॅशनल,यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तितिक्षा कला साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा २०२६ मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यात देण्यात येणाऱ्या तितिक्षा प्रमोद मात गौरव पुरस्कारासाठी कवि गजानन जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

समाज, साहित्य व सांस्कृतिक कवि संमेलन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेने हा सन्मान जाहीर केला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होणार असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

सदर पुरस्कार २२ मार्च २०२६ रोजी पुणे येथे होणाऱ्या तितिक्षा कला साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार असून कार्यक्रमाचे स्थळ व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या सन्मानाबद्दल तितिक्षा इंटरनॅशनलच्या वतीने मा. गजानन जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी साहित्य, कला व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले.