Home Breaking News ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला सिंदखेडराजा उपविभागामध्ये प्रारंभ!

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला सिंदखेडराजा उपविभागामध्ये प्रारंभ!

222

बुलडाणा चौफेर : स्मिता उबाळे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ शासन सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आजपासून या अभियानाचा प्रारंभ झाला आहे. सिंदखेड राजा उपविभागातील सिंदखेड राजा तालुक्या मधील सोनाशी व साखरखेर्डा मंडळामध्ये व देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर येथे या शिबिराचा प्रारंभ आज आमदार मनोज कायंदे यांच्या आई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती नंदाताई कायंदे यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले.

सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी असलेल्या महसूल विभागातील महत्वाच्या १५ स्वरुपातील सेवा एकाच ठिकाणी मार्गी लावण्याचा या शिबिरामध्ये प्रयत्न झाला आहे.

तहसील कार्यालय सिंदखेडराजा व देऊळगाव राजा यांच्याकडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.महसूल विभागाच्या सर्व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचाव्यात व प्रलंबित प्रश्नांचा जागेवरच निपटारा व्हावा यासाठी सिंदखेड राजा उपविभागातील सोनाशी व साखरखेडा व देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर मंडळातील गावातील नागरिकांना विविध शासकीय योजणांचा प्रत्यक्ष हजर राहून जागेवरच समस्याचे तत्पर निराकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

 

 

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

या शिबिरामध्ये शेतकरी, विद्यार्थी, महिला व सर्वसामान्य नागरिकांना एका छताखाली विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला. या शिबिरामध्ये

खालील उपलब्ध सेवा होत्या

1. फेरफार अदालत – प्रलंबित वारसा नोंदी व इतर फेरफार मंजुरी

2. सातबारा दुरुस्ती – वारस नोंद, बँक बोजा, क्षेत्र दुरुस्ती

3. जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र वाटप

4. श्रावण बाळ व संजय गांधी योजना – प्रलंबित प्रकरणे मंजुरी

5. नवीन रेशन कार्ड वाटप व विभक्तीकरण

6. वर्ग २ जमीन वर्ग १ मध्ये रूपांतर

7. कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन

8. आरोग्य विभागामार्फत आभा कार्ड वाटप

9. पोस्ट विभागाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन

10. पीएम किसान प्रलंबित हप्ते – लँड सीडिंग

11. शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी तयार करणे

12. ई-मोजणीसाठी अर्ज स्वीकारणे

13. लक्ष्मी मुक्ती योजनेचे अर्ज

14. सलोखा योजनेचे अर्ज

15. आधार अपडेट सुविधा

उपलब्ध आहेत. सदर शिबिराला तुळजापूर चे माजी सरपंच भानुदास कोल्हे,

उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा प्रा . संजय खडसे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, पशुसंवर्धन अधिकारी डॉ अक्षय ,तालुखा कृषी अधिकारी दिलीप वाघ ,नायब तहसीलदार सायली जाधव, संतोष मुंढे ,मंडळ अधिकारी रामदास मांटे , विनोद डोईफोडे व ग्राम महसूल अधिकारी श्री.बरांडे,श्री टेकाळे,श्री.जाधव,श्री.सोळंके,

महसूल सेवक रामप्रसाद शेरे  महसूल सेवक विठ्ठल हरणे

महसूल सेवक बुरकुल व तसेच तुळजापूर महसूल मंडळातील बहुसंख्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.