Home आपला जिल्हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी चिमुकल्यांची शब्दांजली; तांदुळवाडी अंगणवाडीत रंगला ३७८ व्या...

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी चिमुकल्यांची शब्दांजली; तांदुळवाडी अंगणवाडीत रंगला ३७८ व्या बीजेचा भक्ती सोहळा.

163

बुलडाणा चौफेर वृत्तसेवा : स्मिता उबाळे

“आनंदाचे डोही आनंद तरंग | आनंदचि अंग आनंदाचे ||” या उक्तीप्रमाणे अवघ्या महाराष्ट्राला भक्तीच्या सागरात न्हाऊ घालणाऱ्या विश्ववंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा आज ३७८ वा सदेह वैकुंठगमन सोहळा (तुकाराम बीज) मोठ्या उत्साहात साजरा झाला. या मंगल दिनाचे औचित्य साधून तांदुळवाडी रुम्हणा ग्रामपंचायत, जांभोरा बीट ता.सिंदखेडराजा जि.बुलढाणा येथील अंगणवाडी केंद्रात चिमुकल्या वारकऱ्यांनी अभंगांचा गजर करत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना भावपूर्ण अभिवादन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना वंदन करण्यात आले.तर अंगणवाडीतील बालचमूंनी साडेतीनशे वर्षांहून अधिक काळ जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे गायन केले.यावेळी कोहिनूर खरात, वेदिका नागरे, पंकज काळे, तन्वी पांचाळ, ज्योती खरात आणि नीलम काळे या विद्यार्थ्यांनी आपल्या बोबड्या बोलांतून ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामाचा जयघोष करत उपस्थित सर्वांची मने जिंकली.अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांनी विद्यार्थ्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग ‘गाथा’ ग्रंथाचे महत्त्व आणि त्यांच्या साध्या-सरळ जीवनपद्धतीची ओळख करून दिली. त्यांना अंगणवाडी मदतनीस सौ. साधना राजरत्न खरात यांनी मोलाचे सहकार्य केले.या भक्तिमय सोहळ्याला गावातील दरूबाई खरात, सुनिता खरात, गोदावरी खरात आणि जागृती काळे या महिलांची व ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती. ३७८ व्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त अंगणवाडीत राबवण्यात आलेल्या या आध्यात्मिक उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.