बुलडाणा चौफेर न्यूज कडुबा पैठणे
बुलढाणा – विविध देशातील नावलौकिक असलेल्या भिकू संघाच्या उपस्थितीमध्ये बुलढाणा येथे मूकनायक फाउंडेशन द्वारा येत्या ११ ऑक्टोबर ऐवजी 22 नोव्हेंबर 2025रोजी जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या धम्म परिषदेला भारत चीन जपान थायलंड श्रीलंका मलेशिया सह इतर बौद्ध देशातील भिकू देखील उपस्थित राहणार आहेत. या धम्म परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा मूकनायक फाउंडेशन द्वारा प्रतिष्ठेचा समजला जाणारा*मूकनायक पुरस्कार* देऊन गौरव देखील करण्यात येणार आहे. त्यासाठी कला, वैद्यकीय, संरक्षण, विधी ,शिक्षण ,तंत्रज्ञान,उद्योग, समाजकार्य, साहित्य व प्रशासन इत्यादी क्षेत्रातील दखलपात्र कामगिरी करणाऱ्या मान्यवरांनी आपल्या कार्याचा अहवाल दोन प्रती मध्ये पाठविण्याचे आवाहन मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी केले आहे. पुरस्कारासाठी अहवाल पाठविण्याची मुदत पुढील 10 ऑक्टोंबर पर्यंत असून दोन प्रती मध्ये पाठवणे बंधनकारक असणार आहे. या सोबतच समाजातील उद्योजकांना चालना देण्यासाठी व नवउद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी बिझनेस एक्सपोचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. या एक्सपो मध्ये देखील उद्योजक महिला बचत गट व इच्छुक तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे याचे देखील आवाहन मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पवार यांनी केले आहे. गेल्या वर्षी मूकनायक फाउंडेशन द्वारा आयोजित जागतिक धम्म परिषदेला विविध स्तरातून बौद्ध धम्म बांधवांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद लाभला होता. बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बौद्ध अनुयायांची उपस्थिती देखील दखलपात्र होती. चक्रवर्ती सम्राट महान राजा अशोक यांच्या पाऊलखुणांनी पवित्र झालेल्या ऐतिहासिक अशा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जागतिक धम्म परिषदेचे आयोजन हे बौद्ध धर्म अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
आपल्या कार्याचा अहवाल पाठवण्यासाठी पत्ता- मूकनायक फाउंडेशन अपूर्व व्हिला चिखली रोड चांडक – ले- आऊट बुलढाणा
77 20 999 345 email id- mooknayakbld2025@gmail.com






