बुलडाणा चौफेर न्यूज : सुनिल अंभोरे प्रतिनिधी
क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तसेच स्वर्गीय मधुकरराव खंडारे यांच्या स्मृती पितर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साखरखर्डा येथे भव्य ,दिव्य कार्यक्रमांमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने याही वर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक, शिक्षक, सांस्कृतिक, कृषी, प्रशासकीय, पत्रकारिता,कला, पर्यावरण, साहित्य, क्रिडा, आदी, क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचाली करिता राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्याचे ठरवले आहे,पुरस्काराचे स्वरूप, सुंदर ट्रॉफी, सन्मानपत्र, पदक, गुलाब पुष्प पेन मानाचा फेटा, शाल, असणार आहे,तरी इच्छुकांनी खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर आपला प्रस्ताव 15 ऑक्टोबर पर्यंत पाठवावा,
8657231119
पुरस्कार निवड समिती, विकास सुखदाने,अँड वर्षाताई कंकाळ, गणेश चव्हाण, समाधान सरकटे, राहुल साबळे, यांची समिती पुरस्कारार्थी यांची निवड करेल. सविस्तर राज्यस्तरीय पुरस्कारा साठी प्रस्ताव पाठवण्यासाठी खालील
मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.संपर्क,7350956344,9822503218,7823029945,7823870501, सर्व पुरस्कारथी यांनी लवकरात लवकर आपले प्रस्ताव सादर करावे असे आवाहन आयोजक पत्रकार सचिन खंडारे व समितीच्या वतीने करण्यात आले आहे.






