बुलडाणा चौफेर न्यूज
गेल्या चार दिवसापासून सिंदखेडराजा तालुक्यामध्ये पाऊस पडत आहे.यामुळे नदी नाल्या रस्ते सुद्धा पाण्याने खळखळ वाहू लागले आहे,
याचाच फटका वृक्षांना हा बसत आहे गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सतत पावसामुळे जमिनीचे मुळे सैल होत असून दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता शिंदी ते मेरा खुर्द रस्त्यावर भले मोठे बाभळीचे झाड पडले, सुदैवाने झाड फोडले तेव्हा कुठल्याही प्रकारचे वाहन या ठिकाणी नव्हते, झाड पडल्यामुळे जाण्या-येण्याकरता कुठलाही रस्ता नसल्यामुळे दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामध्ये एसटी बस सुद्धा होत्या,सदर घटनेची माहिती शिंदी गावच्या सरपंच सौ साधना खरात यांना मिळताच,

त्यांनी तातडीने जेसीबी लावून भले मोठे बाभळीचे झाड बाजूला केले. व वाहतूक सुरळीत केली, खरंतर हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे परंतु गावाच्या हिताच्या पलीकडे सुद्धा माणुसकी या नात्याने सरपंच सौ खरात यांनी काम चोख बजावले आहे, सदर वाहतूक सुरू करण्यासाठी सरपंच पती अशोक खरात, पत्रकार सचिन खंडारे, सर्वांनी बांधकाम विभागाचे काळे, नितेश खरात, ज्ञानेश्वर बंगाळे हनुमान खरात यांनी सहकार्य केले.







