त-हाडी:-राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या मान्यताने तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय श्री जयंतराव पाटील यांच्या आदेशाने व युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख यांनी श्री.भोला बापू सैंदाणे यांची पक्षातील कामाची दखल घेऊन एरंडोल व पारोळा विधानसभा निरक्षक पदी निवड केली त्यानिमित्त त्यांना नियुक्तपत्र नुकतेच त्यांना प्रदान करण्यात आले.
भोला सैंदाणे हे सर्वसामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्यावर एरंडोल व पारोळा यासारख्या मोठ्या मतदार संघाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवुन पक्षश्रेष्ठींनी भोला सैंदाणे यांच्या कामावर विश्वास दाखवला आहे. या निवडीबद्दल भोला दादा यांचे सर्वत्रदुर अभीनंदन व कौतुक केले जात आहे.
भोला दादा यांनी एक सर्वसामान्य कुटुंब जन्म घेतल्यानंतर गावाकडून शिक्षणासाठी धुळे शहरात आले असताना कुटुंबातलं कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी व वारसा नसताना स्वतःच्या हिमतीवर धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करायला सुरुवात केली २०१० मध्ये त्यावेळी पक्षाने त्यांच्यावर शाखा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली त्यानंतर अनेक पदांवर काम करण्याची संधी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव या पदापर्यंत मजल मारणारा व सर्वसामान्य जनतेसाठी धावून जाणारा व सामाजिक कार्याची आवड असलेला युवकांना एकजूट करणारा युवकांचे मोठं कौशल्य संघटन उभा करणारा नाभिक समाजाचे युवा नेतृत्व भोला सैदांणे यांचे वडील स्वर्गवासी बापूसाहेब सैदांणे आपल्या वडिलांचा वारसा पुढे कायम चालू ठेवणारा व वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक जीवनात काम करत असणारे युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव भोला दादा सैदांणे हे आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वदूर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
*राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सचिव -श्री.भोला सैंदाणे*
महाराष्ट्रातील एकच संघर्ष योद्धा ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब.
पक्षासाठी नव्हे तर तमाम महाराष्ट्र जनतेसाठी लढणारा एकमेव नेता हे म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब आम्हाला ग्रामीण भागातील तरुणांना एवढ्या मोठ्या पक्षाचे विधानसभा निरीक्षक पदी काम करण्याचे संधी मिळत आहे हे फक्त आमच्या आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्यामुळे त्यांना बघूनच आम्हाला सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. या विधानसभेचे निरीक्षक पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्यामुळे निश्चितच मी तन-मन धनाने पार पाडेल अशी आशा व्यक्त करतो.






