Home Breaking News भरधाव हेवीट्रकने स्कुटी वरील दोघांना चिरडले, आजोबा नातवाचा जागीच मृत्यु

भरधाव हेवीट्रकने स्कुटी वरील दोघांना चिरडले, आजोबा नातवाचा जागीच मृत्यु

245

(मद्यधुंद अवस्थेत फरार होणाऱ्या ट्रकचालकास पोलीसांनी फिल्मी स्टाईलने पाठवलाग करून पकडले)

✒️ बबलू भालेराव✒️ (उमरखेड तालुका प्रतिनिधी)
मो 9637107518

उमरखेड :- मध्य धुंद अवस्थेत भरधाव हेवीट्रक चालवीत स्कुटी वरील दोघांना अक्षरशा चिरडून टाकले यात आजोबा व नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि ५ रोजी सकाळी १० वाजताचे दरम्यान बोरी – तुळजापुर महामार्गावरील महागाव रस्त्यावरील नांदगव्हाण घाटात घडली.

दोघांना चिरडून वाहनासह फरार होऊ पाहणाऱ्या ट्रकचालकास पोलिसांनी पाठलाग करून रमणीकभाई भीमजीभाई पटेल (६५) व केतव राजेश पटेल (१९) दोन्ही रा. हनुमान वार्ड उमरखेड असे भीषण अपघातात मृत पावलेल्या आजोबा व नातवाचे नाव असून रमनिकभाई पटेल यांचा ऑटोमोबाईल चा व्यवसाय होता ते महागाव येथे नातवाच्या कॉलेजच्या कामासाठी स्कुटी वरून नातवाला घेऊन जात होते.

यावेळी नांदेड कडून यवतमाळ कडे जात असलेल्या ट्रक क्र.एम एच ४९ एटी २९०८ सात चालक महेंद्र नथुजी बागडे (५६) रा सावनेर .हा अमली पदार्थाच्या नसेल भरधाव वेगाने ट्रक वाळवीत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली.

भरधाव वेगात झालेल्या भीषण अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक अधिक भरधाव वेगाने कळवला.

सदर घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शिनी पोलिसांना तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी महागाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरस्वती राठोड, शेख वसीम, आणि पोलीसांचा ताफा सोबत घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला. अवघ्या १० मिनिटात अंबोडा गावाजवळ या ट्रक चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

महिंद्र नत्थुजी बागडे (५६) असे ट्रकचालकाचे नाव असून तो सावनेर येथील रहिवासी असल्याचे कळते.मृतदेहावर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

चौकट:- उमरखेड मध्ये शोककळा अतिशय सामाजिक व धार्मिक म्हणून पटेल परिवाराची उमरखेड मध्ये ओळख आहे.
या परिवारातील रमनिक भाई व त्यांचा नातू केतव या आजोबा व नातवाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची वार्ता उमरखेडला येऊन पोहोचल्यानंतर उमरखेडमध्ये शोककुळा पसरली होती.