Home Breaking News राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील सप्तशृंगी माता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त...

राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील सप्तशृंगी माता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

137

दररोज खिचडी प्रसादाचे वाटप

कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट

राहुरी तालुक्यातील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात कायम अग्रेसर असलेल्या चैतन्य भाऊ मित्र मंडळाच्या वतीने यंदा सप्तशृंगी माता नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दिनांक ३ ते १२ ऑक्टोंबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्तशृंगी माता नवरात्र मंडळाच्या वतीने वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.या निमित्ताने स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी सप्तशृंगी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व घटस्थापना तसेच श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपुर ते राहुरी फॅक्टरी भगवती मातेच्या ज्योतीचे स्वागत करण्यात आले. सप्तशृंगी माता नवरात्र उत्सव मंडळ
प्रसादनगर राहुरी फॅक्टरी आयोजित
दि. ३/१०/२०२४ रोजी ज्योत मिरवणुक घटस्थापना
दि. ४/१०/२०२४ रोजी रांगोळी स्पर्धा
दि. ५/१०/२०२४ रोजी संगीत खुर्ची
दि. ६/१०/२०२४ रोजी डान्स कार्यक्रम
दि. ७/१०/२०२४ रोजी चैतन्य भाऊ आल्हाट मित्र मंडळ आयोजीत खिचडी महाप्रसाद
दि. ८/१०/२०२४ रोजी देवीचे गाणे
दि. ९/१०/२०२४ रोजी लिंबु चमचा
दि. १०/१०/२०२४ रोजी दांडिया
दि. ११/१०/२०२४ रोजी होम हवन
दि. १२/१०/२०२४ रोजी दांडिया, डान्स
व सायंकाळी विसर्जन होईल

तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे व स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सप्तशृंगी माता नवरात्र उत्सव मित्र मंडळाच्या वतीने तसेच मंडळाच्या सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.