कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट
राहुरी – राहुरी तालुक्यातील गोपाल कृष्ण गोशाळेला महाराष्ट्र शासनाने गोसेवा आयोगामार्फत बांधकामासाठी निवारा शेड विहीर व गोबर गोमूत्र प्रकल्प यासाठी वीस लाखाचे अनुदान मंजूर केले आहे.
त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते संजयजी कटारिया यांच्या शुभ हस्ते व डॉ. सुनीलजी तुंबारे – उपायुक्त, अहमदनगर जिल्हा पशुधन अधिकारी, तसेच जिल्हा पशुधन अधिकारी मा. दिघे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व आंतरराष्ट्रिय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
उपस्थित सर्व मान्यवरांनी गोशाळेला शुभेच्छा दिल्या..
श्रीरामपूर येथील गोप्रेमी श्रीमान विकी सेठ शर्मा यांनी स्वेच्छेने भरीव मदत देण्याचे कबूल केले. कार्यक्रमासाठी कल्याणजी कुंकूलोळ, सुनीलजी गुप्ता संतोष लुंकड, वैभव लुंकड, प्रेमचंद कुंकूलोळ, मेजर अमोल दुधाडे, कामगार नेते चंद्रकांत कराळे, भास्कर साळवे, सोपान काकडे, भाऊसाहेब गुंजाळ, बागुल साहेब, आदी मान्यवर उपस्थित होते.
गोशाळेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवर अधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल ललित चोरडिया यांनी सर्वांचे आभार मानले.






