Home Breaking News उमरखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

उमरखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

267

✒️ बबलू भालेराव (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9637107518

उमरखेड:- (दिनांक १३ सप्टेंबर)
स्थानिक संजोग भवन येथे एम एच ती सि ए टी (MHT-CET) मध्ये उत्कृष्ठ गुण प्राप्त करून विविध नामवंत इंजिनियरींग कॉलेज मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पेंन्दे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबुसिंग राठोड, संतोष गुजर सर , विशाल लिचडेसर , गजानन शिंदे सर , आकांक्षा देशमुख मॅडम हे होते यावेळी ओम सकवान या विद्यार्थ्यांने देशातील नामांकित नंबरचे कॉलेज(COEP) मिळाले आहे.

तसेच सारंग राजेश वासमवार, अभिषेक वैभव मांडवगडे, शिवांश सुनील वानखेडे, प्रतीक्षा गजानन आळणे, श्रृती माधवराव सूर्यवंशी, गौरी दळवी, सृष्टी ताडकुळे, या सर्व विद्यार्थ्याचा शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन शिंदे सर तर आभार आकांक्षा देशमुख मॅडम यांनी मानले.

ग्रामीण भागातील विद्यार्थी उमरखेड सारख्या छोट्याशा शहरातील क्लासेस लावून उत्कृष्ठ गुण घेतल्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.