नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यामध्ये दिनांक ३१ रोजी रात्रीच्या आठ वाजल्यापासून आज गेल्या चार दिवसापर्यंत अतिवृष्टी झाल्याने पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे जनावरासह सर्वांचं जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून सर्व
नागरिकांना आवाहन केले आहे की आपण आपल्यासह स्वतःच्या जनावरांची सुद्धा काळजी घ्यावी नदी काठावरील नागरिकांना हिमायतनगरचे नायब तहसीलदार एस व्हि ताडेवाड यांनी आज पळसपुर येथे येऊन नागरिकांशी संवाद साधताना सूचना दिल्या आहेत.
यावेळी मंडळ अधिकारी बि एम चव्हाण,के पि पवार म्याडंम, पळसपुर सजाचे तलाठी एस वि जावरकर, यांनी आज नदी काठावरील गावांना भेटी देऊन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे पुढे बोलताना ताडेवाड म्हणाले की आपण आपल्या शेतातील पिकांचे नुकसान झाले त्याचि तक्रार विमा कंपनीकडे
तात्काळ करावी आणि वरील जसे आदेश येतील त्यानुसार आमचे तलाठी मंडळ अधिकारी हे प्रत्येक जाय मोक्यावर जाऊन शेतीसर्वेचा पंचनामा करतील कोणीही काळजी करू नये आणि वाढत्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाण्याचे धाडस करू नये सर्वांनी सतर्क करावे असेही यावेळी सांगण्यात आले तर डोलारी या गावाचा तालुक्याची संपर्क गेल्या दोन दिवसापासून तुटल्याने त्या ठिकाणी नायब तहसीलदार ताडेवाढ
यांनी आपली टीम घेऊन जाण्याचा प्रयत्न केला परंतु रस्त्याच्या पुलाचे आधरवड बांधकामामुळे डोलारी या गावाला जाऊ शकले नाही सरपंच माने यांच्याशी भ्रमणध्वनी वरून अडीअडचणी जाणून घेतल्या आणि जर काही अडचण भासल्यास तात्काळ संपर्क करा असे फोनवरून सांगण्यात आले आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते






