दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी /-
आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड, मुलींचे हायस्कूल हदगाव यांच्या वतीने आयोजित शोध प्रज्ञावंतांचा या परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ थाटात पार पडला.
आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडच्या वतीने दरवर्षी शोध
प्रज्ञावंतांचा ही गुणवत्ता शोध परीक्षा आयोजित केली जाते. एप्रिल २०२४ मध्ये आयोजित केलेल्या या परीक्षेत हदगाव तालुका परिसरातील जवळपास ४ ते ५ शाळांनी सहभाग नोंदविला होता. यातून मुलींचे हायस्कूल मधील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी वैष्णवी किशनराव सूर्यवंशी हिने ८२ गुण
प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविल्याने तिला सन्मानपत्र , रोख २०००/- रु देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता नववीची विद्यार्थिनी तन्वी विठ्ठल जाधव हिने ८१ गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकाविल्याने तिला सन्मानपत्र, रोख १०००/- रु देऊन सत्कार करण्यात आला.
इयत्ता आठवी मधील शुभांगी सुरेश वानखेडे, रुपाली तुकाराम कदम तर दहावी मधील दीपाली तुकाराम कदम, रिया विश्वनाथ वानखेडे या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे त्यांचा गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. एन. वाय. काळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवशाहीर गजानन जाधव हे होते.
पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक व परीक्षा आयोजना मागील भूमिका आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. सौरभ माधवराव जाधव यांनी विशद केली. शिवश्री गजानन जाधव यांनी या परीक्षेचे स्वरूप, आयोजन याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजय चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा. शंकर माने यांनी मानले.
या कार्यक्रमास विशेष सहकार्य स्थानिक संयोजन समितीतील प्रा. अर्जुन नरवाडे, प्रा. सुनील खिल्लारे, विकास जाधव, निलेश जाधव यांनी केले. यावेळी शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






